बोमन इराणी यांची ओटीटी प्लॅटफॉर्मवर एन्ट्री, ‘मासूम’मधून करणार पदार्पण

6 भागांची ही मालिका 17 जून रोजी प्रदर्शित होणार आहे. त्यांच्यासोबत नव्या दमाची अभिनेत्री समारा तिजोरीही या सीरिजमध्ये दिसणार आहे.

ज्येष्ठ अभिनेते बोमन इराणी (Boman Irani) ‘मासूम’च्या निमित्ताने ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणार आहेत. डिज्नी हॉटस्टारवर ही सीरिज प्रदर्शित होणार आहे. ही मालिका पंजाबमधील फलौली येथील कपूर कुटुंबाच्या जीवनातील अकथित सत्ये उलगडून दाखवेल, ज्यामध्ये जटिल नातेसंबंधांची गतिशीलता काळ आणि महत्त्वाकांक्षेनुसार बदलते. 6 भागांची ही मालिका 17 जून रोजी प्रदर्शित होणार आहे. त्यांच्यासोबत नव्या दमाची अभिनेत्री समारा तिजोरीही या सीरिजमध्ये दिसणार आहे. वडील आणि मुलीमधल्या गुंतागुंतीच्या नात्याची झलक यातून पाहायला मिळणार आहे. (Bowman Irani’s entry on OTT platform, will make his debut from ‘Masoom’)

मिहीर देसाई दिग्दर्शित हॉटस्टार स्पेशल ‘मासूम’ या शोची निर्मिती ड्रीमर्स अँड डोअर्स कंपनीच्या बॅनरखाली करण्यात आली आहे, जो रिलायन्स एंटरटेनमेंट आणि प्रीमियम कंटेंट स्टुडिओचा भाग आहे. गुरमीत सिंग याचे शोरनर असून यात मंजरी फडणीस, वीर राजवंत सिंग, उपासना सिंग आणि मनुर्शी चढ्ढा आदी प्रमुख कलाकार आहेत. या मालिकेत प्रसिद्ध आनंद भास्कर यांनी रचलेला एक भावपूर्ण साउंडट्रॅक देखील असणार आहे.

हेही वाचा – Video: बोमन इराणीने ‘या’ अभिनेत्रीबरोबर केला रिक्षातून प्रवास

या सीरिजविषयी बोलताना ज्येष्ठ अभिनेते बोमन इराणी म्हणाले, “मी डिज्नी+ हॉटस्टारवरील ‘मासूम’सोबत डिजिटल क्षेत्रात पदार्पण करतो आहे, जे या वर्षी माझ्या काही आवडत्या सीरिजपैकी आहे. ही सीरिज ही एक खिडकी आहे, जी माझ्यासाठी नवीन जग उघडणार असून मला मोठ्या प्रेक्षक वर्गापर्यंत पोहोचवणार आहे. माझी रील लाइफ मुलगी समारा हिच्यासोबत तिच्या वडिलांची भूमिका करणे खूप आव्हानात्मक होते कारण ती खूप हिंमतबाज मुलगी आहे. समारासारख्या ताज्या प्रतिभेच्या आणि अत्यंत हुशार कलाकारासोबत काम करण्याचा अनुभव उत्तम होता. एका तरुण अभिनेत्याचा अभिनय साकारताना प्रत्यक्ष पाहणे, माझ्यासाठी आनंददायक होते आणि त्यामुळे एकप्रकारे मला देखील प्रगल्भ होण्यास मदत झाली.”

हेही वाचा – सलमान खानच्या ‘टायगर ३’ मध्ये शाहरूख खानची जबरदस्त एंट्री

दिग्दर्शक मिहीर देसाई म्हणाले, “मुलीचा सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न जेव्हा तिचे संपूर्ण कुटुंब ते लपविण्याचा प्रयत्न करते तेथूनच मासूमची कहाणी सुरू होते. बोमन इराणी आणि समरा तिजोरी यांच्यासोबत काम करताना मला आनंद झाला जे या मालिकेत वडील-मुलीचे हृदयस्पर्शी नाते चित्रित करतात.”