अभिनेत्री कंगना रनौतचा सिनेमा ‘इमरजेंसी’ हा रिलीजनंतर 10व्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर कमाई करतो आहे. या सिनेमाच्या माध्यमातून कंगनाने भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली आहे. इतकेच नव्हे तर या सिनेमाचे दिग्दर्शन देखील कंगनाने स्वतः केले आहे. तगडी स्टारकास्ट आणि सत्य घटनेवर भाष्य करणारा हा सिनेमा आतापर्यंत करोडोंचा गल्ला पार करून गेला आहे. असे असले तरीही क्रिटिक्स सांगतात की, करोडोंची कमाई झाली तरीही हा सिनेमा फ्लॉपचं ठरणार. शिवाय ‘आजाद’ सिनेमादेखील बॉक्स ऑफिसवर तग धरेल, असे वाटत नाही. (Box Office Collection of Emergency and Azaad Cinema)
करोडोंची कमाई, तरीही फ्लॉप होणार
बॉक्स ऑफिसवर कंगना रनौतचा ‘इमरजेंसी’ हा सिनेमा किती दिवस टिकेल, ते नेमकं सांगता येणार नाही. भले या सिनेमाने करोडोंची कमाई केली असेल पण मीडिया रिपोर्टनुसार, रिलीजनंतर 10 दिवसात हा सिनेमा बजेटच्या केवळ 28% रक्कम कव्हर करू शकला आहे. प्रजासत्ताक दिनादिवशी (26 जानेवारी) रविवारी या सिनेमाने एका दिवसांत करोडो रुपये कमावले. मात्र, यामुळे काही विशेष फरक पडेल असे दिसत नाही. परिणामी कंगनाच्या करिअरमधला हा 11वा फ्लॉप सिनेमा ठरणार असे दिसत आहे.
गेल्या शुक्रवारी (24 जानेवारी) अक्षय कुमारचा ‘स्काय फोर्स’ सिनेमा प्रदर्शित झाला. ज्याने 3 दिवसांत कमाईचा चांगला वेग पकडला आहे. याचा परिणाम थेट कंगनाच्या ‘इमरजेंसी’ आणि अभिषेक कपूरच्या ‘आजाद’वर झालाय. त्यात 31 जानेवारी 2025 रोजी शाहिद कपूरचा ‘देवा’ सिनेमादेखील प्रदर्शित होतोय. त्यामुळे हे दोन्ही सिनेमा बॉक्स ऑफिसवर माना टाकणार हे नक्की.
‘इमरजेंसी’ सिनेमाचं BO कलेक्शन
कंगनाच्या ‘इमरजेंसी’ सिनेमाचे एकूण बजेट 60 करोड़ रुपये इतके आहे. मात्र, रिलीजनंतर 10 दिवस उलटूनही या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर केवळ 16.70 करोड रुपये कमावले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, प्रजासत्ताक दिनाच्या सुट्टीचा सिनेमाला चांगला फायदा झाला. एका दिवसात या सिनेमाने 1.15 करोड रुपये कमावले. असे असले तरीही एकूण कमाई पाहता हा सिनेमा फ्लॉपच्या मार्गावर असल्याचे स्पष्ट आहे.
‘आजाद’ सिनेमाचं BO कलेक्शन
दिग्दर्शक अभिषेक कपूर यांच्या ‘आजाद’ सिनेमाची ‘इमरजेंसी’पेक्षा वाईट हालत आहे. या सिनेमाच्या माध्यमातून राशा थडानी आणि अमन देवगण यांनी बॉलिवूडमध्ये डेब्यू केलाय. मात्र, सिनेमाच्या कमाईचा आकडा पाहून हा सुपरफ्लॉप असल्याचे समजते. शनिवार- रविवारसारखा विकेंड असूनही या सिनेमाने केवळ 20 लाख रुपयांची कमाई केली आहे. गेल्या 10 दिवसांत या सिनेमाचे एकूण कलेक्शन केवळ 7.26 करोड रुपये आहे. मात्र, सिनेमाचे बजेट 80 करोड रुपये असल्यामुळे ही कमाई कवडीमोल वाटू लागली आहे.
हेही पहा –
Shahid Kapoor : शाहिद कपूरच्या ‘देवा’ सिनेमावर सेन्सॉरची कात्री, सिनेमात केले 3 मोठे बदल