घरमनोरंजनबॉयकॉट बॉलिवूड ट्रेंड बंद व्हायला हवा - सुनील शेट्टी

बॉयकॉट बॉलिवूड ट्रेंड बंद व्हायला हवा – सुनील शेट्टी

Subscribe

मुंबईची ओळख असलेली दादासाहेब फाळके चित्रनगरी उत्तरप्रदेशात नेण्याचा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मानस आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई दौऱ्यावर असताना योगींनी बॉलिवूडचे अभिनेते आणि निर्माते यांच्यासोबत संवाद साधला. यावेळी अभिनेता सुनील शेट्टीने देखील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. या वेळी चर्चा करत असताना सुनील शेट्टीने सध्या सोशल मीडियावर सुरु असलेल्या बॉलिवूड विरोधाबाबत चर्चा केली तसेच त्यांच्याकडून मदत मागितली. तसेच तो म्हणाला की, या इंडस्ट्रीमधील लोक ड्रग्स किंवा दुसरे कोणतेही चूकीचे काम करत नाहीत.

या वेळी सुनील शेट्टीने बॉयकॉट बॉलिवूड खूप भयानक असल्याचं म्हटलं. तसेच तो म्हणाला की, प्रत्येक ठिकाणी काहीतरी वाईट असतंच म्हणून प्रत्येकजणच वाईट आहे असं होत नाही. आज लोग विचार करतात की, बॉलिवूड चांगल्या जागी नाही, परंतु आम्ही इथे कितीतरी चांगले चित्रपट तयार केले आहेत. मी अनेक चांगल्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. आता आपल्याला एकत्र यायला हवं आणि यासाठी काम करायला हवं की आता बॉयकॉट बॉलिवूड कसा बंद होईल.

- Advertisement -

आम्ही ड्रग्ज घेत नाही…
सुनील शेट्टी पुढे म्हणाला की, “या इंडस्ट्रीमध्ये 99 % लोक चांगले आहेत. मी आज सुनील शेट्टी आहे तो फक्त यूपी आणि माझ्या चाहत्यांमुळे जर तुम्ही नेतृत्व केले तर आमच्यावर लागलेले कलंक दूर होतील. आम्ही ड्रग्ज घेत नाही आणि आम्ही कोणतेच वाईट कामही करत नाही. आम्ही चांगल्या कामाशी जोडले आहोत. जर याबाबत तुम्ही पंत प्रधानांसोबत चर्चा केली तर यात नक्कीच फरक पडेल.” अशी मागणी योगी आदित्यनाथ यांच्याकडे सुनील शेट्टीने केली.

दरम्यान, उत्तर प्रदेशातील नोएडा येथे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा फिल्मसिटीचा ड्रीम प्रोजेक्ट उभा राहत आहे. या प्रोजेक्टला चालना देण्यासाठी योगी मुंबईतील फिल्मसिटी उत्तर प्रदेशात पळवू पाहत आहेत, असा आरोप त्यांच्यावर मविआतील नेत्यांकडून होत आहे. त्याला उत्तर देताना मुंबई ही मुंबईच आहे. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे, तर उत्तर प्रदेश ही भारताची धार्मिक राजधानी आहे. आम्ही उत्तर प्रदेशात स्वत:ची फिल्मसिटी उभारत आहोत. मुंबईमधून फिल्मसिटी नेण्याचा आमचा कोणताही डाव किंवा विचार नाही, असे योगी आदित्यनाथ यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

 


हेही वाचा :

प्रेमाच्या महिन्यात आता होणार ‘डेट भेट’

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -