Wednesday, May 31, 2023
27 C
Mumbai
घर मनोरंजन बॉलिवूडवर बहिष्कार टाकणे म्हणजे धंदा...स्वरा भास्करचं ट्वीट चर्चेत

बॉलिवूडवर बहिष्कार टाकणे म्हणजे धंदा…स्वरा भास्करचं ट्वीट चर्चेत

Subscribe

अभिनेत्री स्वरा भास्करने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये तिने एका ट्वीटला रीट्वीट करत या बहिष्काराला धंदा असं म्हटलं आहे. स्वराच्या या पोस्टवर सोशल मीडियावर अनेकजण कमेंट्स करत आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर नेहमीच तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते. स्वरा तिच्या चित्रपटांपेक्षा जास्त तिच्या वादग्रस्त आणि परखड वक्तव्यांमुळे चर्चेत येते. सध्या सोशल मीडियावर बॉलिवूड चित्रपटांवर बहिष्कार टाकण्याची मागणी वारंवार केली जात आहे. एकानंतर एक अशा अनेक चित्रपटांना बहिष्काराचा सामना करावा लागत आहे. प्रदर्शित होणारे अनेक चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर फ्लॉप होऊ लागले आहेत. अशातच आता अभिनेत्री स्वरा भास्करने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये तिने एका ट्वीटला रीट्वीट करत या बहिष्काराला धंदा असं म्हटलं आहे. स्वराच्या या पोस्टवर सोशल मीडियावर अनेकजण कमेंट्स करत आहेत.

खरंतर, स्वरा भास्कर ने एका पेजवर करण्यात आलेल्या ट्वीटवर लिहिलंय की, “ब्रह्मास्त्रला सपोर्ट करण्यापेक्षा जेम्स ऑफ बॉलिवूडला सपोर्ट करा आणि रणबीर कपूरचे दर्शन घ्या. तुम्ही खात्री करा की तुमचे पैसे फवाद खानला स्पॉन्सर करण्यासाठी, डेविड हेडलेला मिठी मारण्यासाठी आणि 2611 च्या हिंदूंना दोष देण्यासाठी वापरणार नाही.” याचं पोस्टला री-ट्वीट करत स्वराने लिहिलं की, धंदा आहे! “बॉलिवूडवरील बहिष्काराचा नफ्याचा धंदा”

- Advertisement -

स्वरा भास्करच्या या ट्वीट अनेकजण प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने कमेंट करत लिहिलंय की, “मग तुला वाईट का वाटत आहे, जर फरक पडत नाही तर घरी बसा आणि गपचुप कलेक्शनवर लक्ष द्या.”


हेही वाचा : कोळी समाजाबद्दल मला आदर… वर्षा उसगावकरांनी मागितली माफी

- Advertisement -
- Advertisement -
shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -