घरमनोरंजन'...तर सुजय डहाकेच्या चित्रपटांवर कारवाई करू'

‘…तर सुजय डहाकेच्या चित्रपटांवर कारवाई करू’

Subscribe

सध्या मराठी इंडस्ट्रीमध्ये एकच चर्चा आहे. एका वृत्तपत्राच्या ऑनलाईनला दिलेल्या मुलाखतीत एक ब्राम्हण अभिनेत्रींबद्दल एक वक्तव्य केलं आणि चहूबाजूने त्याच्यावर टिका होऊ लागली. त्याच्या या वक्तव्याचा ब्राम्हण महासंघाने निषेध केला आहे. “डहाके यांचे वक्तव्य हे निव्वळ मूर्खपणाचं आहे. असे म्हणत ब्राम्हण महासंघाने आपली भूमिकाही स्पष्ट केली आहे. “ब्राह्मण कलाकारांबद्दल जे वक्तव्य केलंय त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. निव्वळ मूर्खपणाचं हे विधान आहे. चित्रपट क्षेत्रामध्ये जातीयता पसरवण्याचे हे उद्योग आहेत. प्रसिद्धीसाठी सुजय डहाकेने हे विधान केलेलं आहे असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे,” असे मत दवे यांनी या प्रकरणाबद्दल बोलताना नोंदवले.

मनोरंजन क्षेत्रामध्ये जातीयता पसरवण्याचा हा उद्योग आहे,” अशी टीका ब्राम्हण महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आनंद दवे यांनी केली आहे. “मराठी मनोरंजन क्षेत्रातील प्रत्येक मालिकेमध्ये मुख्य भूमिकेमध्ये ब्राह्मण मुलीच दिसतात. मग इतर मराठी मुली का नाही?”; असा सवाल ‘केसरी’ चित्रपटाचा दिग्दर्शक असणाऱ्या सुजयनं उपस्थित केला होता. भारतात अशी खूप कमी क्षेत्रं राहिली आहेत जिथे कतृत्व, मेहनत आणि सातत्य याचा थेट संबंध यश आणि अपयशाशी असतो. अशा श्रेत्रांमध्ये जात, धर्म, पंथ, गोत्र याचा काहीही संबंध नसतो. अशा क्षेत्रामध्ये जातीयता पसरवणे हे मुर्खपणाचे लक्षण आहे. सुजय डहाके यांनी लगेच हे वक्तव्य मागे घ्यावं असं आमचं म्हणणं आहे. चित्रपट हे क्षेत्र सर्वांसाठी खुलं आहे आणि खुलं रहावं असं अशी आमची भूमिका आहे. हे कुणाचीच मत्तेदारी नसलेलं क्षेत्र आहे. हे तसचं रहावं, प्रत्येकाच्या कतृत्वाला, मेहनतीला इथे यश मिळालं पाहिजे, त्याला इथे मान्यता मिळाली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे,सुजय डहाकेंनी त्यांचे वक्तव्य त्वरित मागे घ्यावं. अन्यथा भविष्यामध्ये त्यांच्या एखाद्या चित्रपटावर काय कारवाई करायची याचा आम्ही विचार करु,” असा इशाराही दवे यांनी दिला आहे.

- Advertisement -

सोशल मीडियावर झाले कलाकार व्यक्त

सोशल मिडियाच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीमधील कलाकारांनी आपली मते मांडली आहेत. अभिनेता शशांक केतकरनेही फेसबुकवरुन ‘कसले बिनबुडाचे आरोप करतोस रे. आपल्या क्षेत्रात फक्त टॅलेंट ला जागा आहे,’ अशी प्रतिक्रिया दिली आहे.

- Advertisement -

शशांक केतकर

माटेगावकर तुझी अभिनेत्री, बापट तुझी लेखिका, देवधर तुझा अभिनेता, जोशी तुझा संगीत दिग्दर्शक आणि तू कसले बिन बुडाचे आरोप करतोस रे. आपल्या क्षेत्रात फक्त टॅलेंट ला जागा आहे.
कृपा करून हे असले स्टंट करू नकोस. त्या पेक्षा तुझ्या कामावर लक्ष दे जमल्यास.
साने आणि मंजुळे हे कॉम्बिनेशन पुरेस नाहीये का तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायला? असो …..
दुसानिस ही माझी सह कलाकार आणि शेलार आणि गुप्ते या आडनावाच्या अभिनेत्री माझ्या आई ची भूमिका करतात ! कांबळे, छल्लारे आणि पवार यांच्या दिग्दर्शनाखाली हा केतकर रोज काम करतो आणि याचा मला अभिमान आहे.
तू कोणत्या जाती धर्माचा आहेस याचा तसूभरही विचार डोक्यात न आणता तुझं कल्याणच होऊदे, तुझे चित्रपट चालुदे हीच इच्छा आहे ?

तुझ्या reference साठी ही एक FB post वाच –

“सुरू असलेल्या मालिका ”
बाळू मामा – कोमल मोरे
राजा राणी – शिवानी सोनार
छत्रपती संभाजी – प्राजक्ता गायकवाड
स्वामींनी – सृष्टी पगारे
Mrs मुख्यमंत्री – अमृता घोंगडे
विठू माउली – एकता लब्धे
प्रेमाचा गेम सेम टू सेम – सायली जाधव
वैजु नं 1 – सोनाली पाटील

“या पूर्वीच्या मालिका ”
तू अशी जवळी रहा – तितिक्षा तावडे
आम्ही दोघी-. खुशबू तावडे
मानसीचा चित्रकार तो -अक्षया गुरव
एक राजकन्या – किरण धाणे
जुळून येती रेशीमगाठी. – प्राजक्ता माळी
छत्री वाली – नम्रता प्रधान
साता जन्माच्या गाठी – अक्षया हींदलकर
सगळ्या उत्तम अभिनेत्री आहेत, आणि त्यांना टॅलेंट मुळे कामं मिळाली आहेत..
कोणतही चॅनल जात , धर्म बघून काम देत नाही तर talent बघून काम देत..
असो.

तेजश्री प्रधान

तेजश्री प्रधान हिनं आपल्या फेसबुक वॉलवर एक पोस्ट शेअर केली आहे. “मी ब्राह्मण नाहीये बरं! सीकेपी आहे. पण गेली अनेक वर्ष माझ्याकडे काम आहे. याला टॅलेंट म्हणूया का?”, अशा आशायची पोस्ट तिनं आपल्या फेसबुक वॉलवर शेअर केली आहे.

स्वतःस अत्यंत प्रतिभावान आणि अभ्यासू समजणारे दिग्दर्शक मा. सुजय डहाके….आपण केलेली वक्तव्ये आणि विधाने यावर इतर…

Sauraabh Gokhaale ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಗುರುವಾರ, ಮಾರ್ಚ್ 5, 2020

सौरभनं अत्यंत परखड अशा शब्दांत सुजय डहाकेची शाळा घेतली आहे. ‘स्वतःस अत्यंत प्रतिभावान आणि अभ्यासू समजणारे दिग्दर्शक मा. सुजय डहाके आपण केलेली वक्तव्ये आणि विधाने यावर इतर कलाकारांनी आणि कलाक्षेत्रातील मान्यवरांनी स्पष्टीकरण द्यावे इतकी तुमची लायकी नाही. पुन्हा या प्रमाणे जातीयवाद आणि जातीपातीचे राजकारण या कलाक्षेत्रात घुसविण्याचा प्रमाद आपणाकडून घडल्यास आमच्या भावना सर्वांसमक्ष आपल्या श्रीमुखावर उमटविण्यात येतील याची नोंद घ्यावी’, असं त्यानं त्याच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -