घरमनोरंजन'ब्रह्मास्त्र'ने रचला इतिहास, तिसऱ्याच आठवड्यात केली बक्कळ कमाई

‘ब्रह्मास्त्र’ने रचला इतिहास, तिसऱ्याच आठवड्यात केली बक्कळ कमाई

Subscribe

भारतीय चित्रपटाच्या इतिहासामध्ये जे आजपर्यंत झालं नाही ते दिग्दर्शक अयान मुखर्जीच्या 'ब्रह्मास्त्र'ने करून दाखवलं आहे. या चित्रपटाने आपल्या प्रदर्शनाच्या तिसऱ्या शुक्रवारी सुद्धा चांगली कमाई केली आहे.

रणबीर कपूर आणि आलिया भट्टचा आगामी ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाने सध्या नवा इतिहास रचायला सुरूवात केली आहे. या चित्रपटाने प्रदर्शनाच्या 15 व्या दिवशी बॉक्स ऑफिसवर करोडोंचा गल्ला जमावला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ‘ब्रह्मास्त्र’ बॉलिवूडच्या इतिहासातील तिसऱ्या आठवड्यात डबल डिजीट स्कोर करणारा पहिला मोठा चित्रपट ठरला आहे.

‘ब्रह्मास्त्र’ने रचला इतिहास
भारतीय चित्रपटाच्या इतिहासामध्ये जे आजपर्यंत झालं नाही ते दिग्दर्शक अयान मुखर्जीच्या ‘ब्रह्मास्त्र’ने करून दाखवलं आहे. या चित्रपटाने आपल्या प्रदर्शनाच्या तिसऱ्या शुक्रवारी सुद्धा चांगली कमाई केली आहे. शिवाय या चित्रपटाला 23 सप्टेंबर रोजीच्या राष्ट्रीय चित्रपट दिनाचा फायदा देखील मिळाला आहे. 23 सप्टेंबर रोजी सर्व चित्रपट 75 रूपयांमध्ये दाखवण्यात आले होते.

- Advertisement -

तिसऱ्या शुक्रवारी कमावले इतके कोटी
23 सप्टेंबर रोजी ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपट सर्व चित्रपट गृहांमध्ये हाऊलफुल होते. तिसऱ्या शुक्रवारी चित्रपटाने 9.75 ते 11 कोटींची कमाई केली आहे.

2022 मधील तिसरा सर्वात मोठा चित्रपट

 

View this post on Instagram

 

A post shared by Ayan Mukerji (@ayan_mukerji)

- Advertisement -

2022 मध्ये आत्तापर्यंत सगळ्यात यशस्वी चित्रपट ‘द कश्मीर फाईल्स’ आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 250 कोटींची कमाई केली होती. त्यानंतर कार्तिक आर्यनचा ‘भूल भुलैया 2’ ज्याने 190 कोटींची कमाई केली होती.

‘दंगल’ आणि ‘पद्मावत’ला देखील टाकलं मागे
‘ब्रह्मास्त्र’ने बॉलिवूडमधील मोठमोठ्या चित्रपटांना मागे टाकले आहे. बॉलिवूडमधील बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणारा संजू, टायगर जिंदा है , पद्मावत, धूम 3 , दंगल आणि चेन्नई एक्सप्रेस यांसारख्या चित्रपटांना मागे टाकलं आहे.


हेही वाचा :

बॉक्स ऑफिसवर ब्रह्मास्त्रच्या कमाईचा जोर ओसरला; 12 व्या दिवशी सर्वात कमी कमाई

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -