घरमनोरंजनअवघ्या तीन दिवसात 'ब्रह्मास्त्र'ने केला 100 कोटींचा टप्पा पार

अवघ्या तीन दिवसात ‘ब्रह्मास्त्र’ने केला 100 कोटींचा टप्पा पार

Subscribe

हिंदी व्यतिरिक्त चित्रपटाने तेलुगू भाषेमध्ये देखील जोरदार कमाई करायला सुरूवात केली आहे. आत्तापर्यंतच्या अनेक मोठमोठ्या चित्रपटांचे रेकॉर्ड तोडायला 'ब्रह्मास्त्र'ने सुरूवात केली आहे.

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्टचा ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपट 9 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाने प्रदर्शनाच्या सुरूवातीलाच पहिले तीन दिवस बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली. हिंदी व्यतिरिक्त चित्रपटाने तेलुगू भाषेमध्ये देखील जोरदार कमाई करायला सुरूवात केली आहे. आत्तापर्यंतच्या अनेक मोठमोठ्या चित्रपटांचे रेकॉर्ड तोडायला ‘ब्रह्मास्त्र’ने सुरूवात केली आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी देखील ‘ब्रह्मास्त्र’ने अॅडव्हान्स बुकिंद्वारे करोडोंची कमाई केली आहे.

2022 मधील सर्वाधिक भव्य चित्रपट
हिंदीमध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटांमध्ये पहिल्या आठवड्याच्या शेवटी कमाई करणारा रेकॉर्ड आत्तापर्यंत कन्नड चित्रपट ‘केजीएफ 2’ चित्रपटाकडे आहे. ज्यामध्ये यावर्षी 14 एप्रिल रोजी प्रदर्शित होऊन पहिल्या आठवड्याच्या शेवटापर्यंत 193.99 कोटींची कमाई केली होती. यावर्षी प्रदर्शित झालेल्या दुसऱ्या कोणत्याही चित्रपटाने पहिल्या आठवड्याच्या शेवटापर्यंत 100 कोटीं पलीकडे कमाई केली नाही. ‘ब्रह्मास्त्र’ बॉलिवूडमधील सर्वाधिक कमाई करणारा पहिला चित्रपट आहे.

- Advertisement -

‘ब्रह्मास्त्र’ने अवघ्या तीन दिवसात केली 122.58 कोटींची कमाई

 

View this post on Instagram

 

A post shared by Alia Bhatt 🤍☀️ (@aliaabhatt)

‘ब्रह्मास्त्र’ने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी 36.42 कोटींची कमाई केली. तर दुसऱ्या दिवशी 41.36 कोटींची कमाई केली, तर तिसऱ्या दिवशी 44.80 कोटींची कमाई केली आहे. दरम्यान, आत्तापर्यंत ‘ब्रह्मास्त्र’ने एकूण 122.58 कोटींची कमाई केली आहे.

- Advertisement -

‘दंगल’ आणि ‘पद्मावत’ला देखील टाकलं मागे
‘ब्रह्मास्त्र’ने बॉलिवूडमधील मोठमोठ्या चित्रपटांना मागे टाकले आहे. बॉलिवूडमधील बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणारा संजू, टायगर जिंदा है , पद्मावत, धूम 3 , दंगल आणि चेन्नई एक्सप्रेस यांसारख्या चित्रपटांना मागे टाकलं आहे.


हेही वाचा :

‘आपडी थापडी’चा टीझर पाहिलात का? श्रेयस-मुक्ताचा अफलातून फॅमिली ड्रामा

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -