‘ब्रह्मास्त्र’ने जगभरातून केला 225 कोटींचा टप्पा पार

अयान मुखर्जीच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या चित्रपटाने कमाईच्या बाबतीत 'कार्किकेय 2' आणि 'सीता रामम' यांसारख्या चित्रपटांना देखील मागे टाकलं आहे.

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्टचा ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपट 9 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासूनच बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करायला सुरूवात केली आहे. हिंदी व्यतिरिक्त चित्रपटाने तेलुगू भाषेमध्ये देखील जोरदार कमाई करायला सुरूवात केली आहे. आत्तापर्यंतच्या अनेक मोठमोठ्या चित्रपटांचे रेकॉर्ड तोडायला सुरूवात केली आहे.

‘ब्रह्मास्त्र’ने सोमवारी बॉक्स ऑफिसवर जवळपास 140 कोटींची कमाई केली होती. तर मंगळवारी देखील चित्रपटाने करोडोंचा टप्पा पार केला आहे. इतकंच नव्हे तर, अयान मुखर्जीच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या चित्रपटाने कमाईच्या बाबतीत ‘कार्किकेय 2’ आणि ‘सीता रामम’ यांसारख्या चित्रपटांना देखील मागे टाकलं आहे.

‘ब्रह्मास्त्र’ने मंगळवारी कमावले इतके कोटी

 

View this post on Instagram

 

A post shared by Ayan Mukerji (@ayan_mukerji)

अयान मुखर्जीच्या दिग्दर्शनातील ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाने अवघ्या पाच दिवसातच प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे. मागील काही दिवसांपूर्वी बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांवर बहिष्कार टाकण्याची मागणी केली जात होती. यामुळे अनेक दिग्गज अभिनेत्यांच्या चित्रपटाचे मोठे नुकसान झाले होते. अशातच ब्रह्मास्त्र नक्की काय कमाल करेल याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले होते. बॉक्स ऑफिसच्या रिपोर्ट्सनुसार, मंगळवारी या चित्रपटाने जवळपास 13 कोटींची कमाई केली आहे आणि भारतीय बॉक्स ऑफिसवर आत्तापर्यंत चित्रपटाने 153.99 कोटींचा टप्पा पार केला आहे.

‘ब्रह्मास्त्र’ने जगभरातून कमावले इकते कोटी
‘ब्रह्मास्त्र’ने आत्तापर्यंत जगभरातून एकूण 225 कोटींचा टप्पा पार केला आहे. बॉलिवूड 2022 मधील हा सर्वात मोठा सुपरहिट असल्याचं म्हटलं जात आहे. ‘ब्रह्मास्त्र’ने टॉलिवूडमधील अनेक दिग्गज चित्रपटांना देखील मागे टाकायला सुरूवात केली आहे.


हेही वाचा :

अवघ्या तीन दिवसात ‘ब्रह्मास्त्र’ने केला 100 कोटींचा टप्पा पार