‘ब्रह्मास्त्र’ बॉलिवूडमधील सर्वाधिक महागडा चित्रपट; 9 सप्टेंबर रोजी 8000 स्क्रिन्स वर होणार प्रदर्शित

'ब्रह्मास्त्र' आता पर्यंतचा सर्वात महागडा चित्रपट असून निर्मात्यांनी चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी 8000 स्क्रिन्सचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे.

अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्टचा बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपट येत्या 9 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. मागील अनेक महिन्यांपासून हा चित्रपट चांगलाच चर्चेत आला आहे. शिवाय या चित्रपटाची अनेक प्रेक्षक आतुरतेने वाट देखील पाहत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हा चित्रपट बॉलिवूडमधील सर्वाधिक माहागडा चित्रपट आहे. दरम्यान, मागील अनेक दिवसांपासून बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांच्या चित्रपटांवर सोशल मीडियाजद्वारे बहिष्कार टाकण्याची मागणी केली जात आहे. या यादीमध्ये ब्रह्मास्त्रचा देखील समावेश झाला होता. त्यामुळे आता या चित्रपटाच्या निर्मात्यांची चिंता वाढली आहे.

‘ब्रह्मास्त्र’चा दिग्दर्शक आयान मुखर्जीसाठी हा चित्रपट अत्यंत खास असल्याचं म्हटलं जात आहे. पौराणिक कथा आणि दैवी शक्तीवर आधारित असलेल्या या चित्रपटाचे स्वप्न त्याने अनेक वर्षापासून पाहिले आहे. त्यामुळे या चित्रपटासाठी त्याने 410 कोटींचा खर्च केला. मिळालेल्या माहितीनुसार, ही किंमत बॉलिवूड चित्रपटांच्या तुलनेत जास्त आहे. ‘RRR’, ‘साहो’, ‘बाहुबली’, ‘2.0’, ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’नंतर आता सर्वाधिक महागड्या चित्रपटांच्या यादीत ब्रह्मास्त्रचा देखील समावेश झाला आहे.

8000 स्क्रिन्स वर होणार प्रदर्शित
‘ब्रह्मास्त्र’ आता पर्यंतचा सर्वात महागडा चित्रपट असून निर्मात्यांनी चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी 8000 स्क्रिन्सचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. यांपैकी 5000 भारतीय स्क्रिन्सवर प्रदर्शित होणार आहे तर 3000 जगभरातील इतर स्क्रिन्सवर प्रदर्शित होईल.

75 रूपयांमध्ये पाहू शकणार चित्रपट
राष्ट्रीय चित्रपट दिनानिमित्त 16 सप्टेंबर रोजी तिकिटाची किंमत फक्त 75 रूपये असणार आहे. त्यामुळे तुम्ही 9 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेला ‘ब्रह्मास्त्र’ तुम्ही 16 सप्टेंबर रोजी 75 रूपयांमध्ये पाहू शकता.

 


हेही  वाचा :  विराटने अनुष्कासाठी केलेल्या पोस्टवर कमेंट करताच वॉर्नर झाला ट्रोल