बॉक्स ऑफिसवर ब्रह्मास्त्रच्या कमाईचा जोर ओसरला; 12 व्या दिवशी सर्वात कमी कमाई

9 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या ब्रह्मास्त्र चित्रपटाने कोट्यावधींची कमाई केली आहे. पहिल्या आठवड्यात या चित्रपटाने अक्षरशः धुमाकूळ घातला. मात्र आता दुसऱ्या आठवड्यात हळूहळू चित्रपटाच्या कमाईचा जोर ओसरला असल्याचं दिसून येत आहे.

रणबीर कपूर आणि आलिया भट्टचा बहुचर्चित चित्रपट ‘ब्रह्मास्त्र’ सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. ‘ब्रह्मास्त्र’ने आत्तापर्यंत कोट्यावधींची कमाई केली असून दिवसेंदिवस ही रक्कम अधिकाधिक वाढत आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी या चित्रपटावर अनेकजण बहिष्कार टाकण्याची मागणी करत होते. मात्र तरीही यावर कोणताच परिणाम झाला नाही. ‘ब्रह्मास्त्र’ने प्रदर्शनापूर्वीच अॅडव्हान्स बुकींगद्वारे 36 कोटींची कमाई केली होती. दरम्यान, आता चित्रपट प्रदर्शित होईन 12 दिवस झाले आहेत. हळूहळू ब्रह्मास्त्रची कमाईचे आकडे आधीपेक्षा कमी होऊ लागले आहेत.

ब्रह्मास्त्रच्या कमाईचा जोर ओसरला?
9 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या ब्रह्मास्त्र चित्रपटाने कोट्यावधींची कमाई केली आहे. पहिल्या आठवड्यात या चित्रपटाने अक्षरशः धुमाकूळ घातला. मात्र आता दुसऱ्या आठवड्यात हळूहळू चित्रपटाच्या कमाईचा जोर ओसरला असल्याचं दिसून येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ब्रह्मास्त्रने प्रदर्शनाच्या 12 व्या दिवशी जवळपास 3.5 ते 4.20 कोटींची कमाई केली आहे. हा आकडा मागील 11 दिवसांच्या तुलनेत खूप कमी आहे. तसेच आत्तापर्यंत या चित्रपटाने 224.10 कोटींची कमाई केली आहे.

‘ब्रह्मास्त्र’ 2022 मधील सर्वात भव्य चित्रपट

 

View this post on Instagram

 

A post shared by Ayan Mukerji (@ayan_mukerji)

9 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या ‘ब्रह्मास्त्र’ने आत्तापर्यंत 224 कोटींचा आकडा पार केला आहे. तसेच संपूर्ण जगभरातून या चित्रपटाने 360 कोटींचा आकडा पार केला आहे.

2022 मधील तिसरा सर्वात मोठा चित्रपट
2022 मध्ये आत्तापर्यंत सगळ्यात यशस्वी चित्रपट ‘द कश्मीर फाईल्स’ आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 250 कोटींची कमाई केली होती. त्यानंतर कार्तिक आर्यनचा ‘भूल भुलैया 2’ ज्याने 190 कोटींची कमाई केली होती.

‘दंगल’ आणि ‘पद्मावत’ला देखील टाकलं मागे
‘ब्रह्मास्त्र’ने बॉलिवूडमधील मोठमोठ्या चित्रपटांना मागे टाकले आहे. बॉलिवूडमधील बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणारा संजू, टायगर जिंदा है , पद्मावत, धूम 3 , दंगल आणि चेन्नई एक्सप्रेस यांसारख्या चित्रपटांना मागे टाकलं आहे.


हेही वाचा :

अवघ्या 10 दिवसांत ‘ब्रह्मास्त्र’ने जगभरातून केला 360 कोटींचा टप्पा पार