Lata Mangeshkar यांचा व्हेंटिलेटर सपोर्ट काढला, प्रकृतीत सुधारणेची रुग्णालयाची माहिती

दोन दिवसांपूर्वीच लता दीदींवर एक्सट्यूबेशनची चाचणी म्हणजेच त्यांचा व्हेंटिलेटर बंद करुन ट्रायल करण्यात आली होती. तेव्हा त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आले होते. त्यानंतर आता लता दीदींचा व्हेंटिलेटर सपोर्ट पूर्णपणे काढून टाकण्यात आला आहे.

lata mangeshkar english song you needed me shared by singer mahesh kale see video
लतादीदींनी गायलेले इंग्रजी गाणं तुम्ही ऐकलं का? महेश काळेंनी शेअर केला video

गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar ) यांना कोरोनाची लागण झाल्याने गेल्या दोन आठवड्यांपासून मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात आयसीयू विभागात उपचार घेत आहेत. लता दीदींच्या प्रकृतीबाबत एक आनंदाची बातमी समोर आली आहे. लता दीदींचा व्हेंटिलेटर सपोर्ट काढून टाकण्यात आला असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती ब्रीच कँडी रुग्णालयाकडून देण्यात आली आहे. ( Lata Mangeshkar ventilator support removed)  व्हेंटिलेटर काढून टाकण्यात आला असला तरी लता दींदीवर आयसीयूमध्ये डॉ. प्रतीत समदानी आणि त्यांच्या टीमच्या निगराणीखाली ठेवण्यात येणार आहे.

एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत किरकोळ सुधारणा झाली असून दोन दिवसांपूर्वीच त्यांचा व्हेंटिलेटर सपोर्ट काढून टाकण्यात आला होता. त्यांना आयसीयूमध्ये डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात येईल अशी माहिती लता दीदींच्या डॉक्टर प्रतीत समदानी यांनी दिली आहे.

लता दीदींच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले होते. दोन दिवसांपूर्वीच लता दीदींवर एक्सट्यूबेशनची चाचणी म्हणजेच त्यांचा व्हेंटिलेटर बंद करुन ट्रायल करण्यात आली होती. तेव्हा त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आले होते. त्यानंतर आता लता दीदींचा व्हेंटिलेटर सपोर्ट पूर्णपणे काढून टाकण्यात आला आहे.

लता दीदींच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी सर्वांनी प्रार्थना करण्याचे आवाहन मंगेशकर कुटुंबीय आणि ब्रीच कँडी रुग्णालयाकडून करण्यात आले होते. लता दीदींच्या प्रकृतीसाठी जगभरातून लता दीदींसाठी प्रार्थना करण्यात आली आहे. अखेर सर्वांच्या प्रार्थनेला यश आले असून लता दीदींच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.

लता मंगेशकर यांना ८ जानेवारी रोजी कोरोनाची सौम्य लक्षणे आढळल्याने मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. लता दीदी रुग्णालयात दाखल झाल्यापासून त्यांच्याविषयी अनेक अफवा पसरवण्यात आल्यात. लता मंगेशकर यांना अधिकृत सोशल मीडिया हँडलवरुन लती दीदींच्या प्रकृतीबाबत अशा प्रकारच्या अफवा न पसरवण्याची विनंती केली होती.


हेही वाचा –  Lata Mangeshkar लवकर बऱ्या व्हाव्यात म्हणून अयोध्येत पूजाअर्चा, होम हवन