Eco friendly bappa Competition
घर मनोरंजन लंडनहून येताना 'या' दोन गोष्टी नक्की घेऊन या', प्रसाद ओककडे चाहत्याने केली भन्नाट मागणी

लंडनहून येताना ‘या’ दोन गोष्टी नक्की घेऊन या’, प्रसाद ओककडे चाहत्याने केली भन्नाट मागणी

Subscribe

मराठी चित्रपट सृष्टीमधील लोकप्रिय कपल म्हणजेच मंजिरी ओक(manjiri oak) आणि प्रसाद ओक(prasad oak). प्रसाद ओक एक उत्तम अभिनेता आणि दिग्दर्शक आहे तर त्याची पत्नी मंजिरी ओक सुद्धा मराठी चित्रपट सृष्टीमध्ये सक्रिय असते. मंजिरी आणि प्रसाद हे दोघंही सोशल मीडियावर सक्रिय असतात. ते नेहमी चाहत्यांना त्यांच्या नवनवीन प्रेजेक्ट बद्दल सांगत असतात. चंद्रमुखी(chandramukhi) या चित्रपटामुळे हे कपल चर्चेत आलं होत. तर धर्मवीर या चित्रपटातली प्रसाद ओकने आनंद दिघेंची व्यक्तीरेखा साकारली त्यामुळे प्रसादाचं सर्वत्र कौतुक झालं होतं.

हे ही वाचा – ‘उलगडणार धर्मवीरची पडद्यामागची कहाणी’

- Advertisement -

मराठी चित्रपट सृष्टीमधील हे गोड कपल सध्या लंडन मध्ये मुसाफिरी करत आहे. प्रसाद आणि मंजिरी ट्रिप साठी लंडनला(london) गेले आहेत. प्रसाद आणि मंजिरीचे(prasad oak – manjiri oak)हेच फोटो सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांची पसंती मिळवत आहेत. त्यांच्या फोटोवर त्यांचे चाहते प्रतिक्रिया सुद्धा देत आहेत. अशातच प्रसाद आणि मंजिरीच्या फोटोवर त्यांच्या एका चाहत्याने कमेंट करत प्रसादकडे एक आगळी – वेगळी मागणी केली आहे.

 

- Advertisement -

१) अभिनेता, दिग्दर्शक प्रसाद ओक आणि त्याची पत्नी मंजिरी सध्या लंडन मध्ये फिरण्याचा आनंद घेत आहेत. प्रसादने त्याचे आणि मंजिरीचे लंडन मधील काही फोटो त्याच्या सोशल मीडिया अकाऊंवरून शेअर केले आहेत.

 

२) प्रसाद आणि मंजिरी लंडनमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी फिरून तिथलंय प्रेक्षणीय स्थळांना भेट देत आहेत. हे दोघंही त्यांची लंडन ट्रिप एन्जॉय करताना दिसत आहेत.

 

३) प्रसादने त्याच्या सोशल मीडियावर लंडनचे फोटो शेअर केले त्याला त्यांच्या चाहत्यांकडून खूप लाईक्स मिळत आहेत. त्याच बरोबर चाहत्यांकडून कमेंट्स सुद्धा येत आहेत. प्रसाद आणि मंजिरीच्या फोटोवर त्यांच्या एका चाहत्याने भन्नाट प्रतिक्रया दिली. त्या प्रतिक्रियेने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

 

४) ‘परत येताना आपला कोहिनूर हिरा व भवानी तलवार तेवढी घेऊन या’ अशी आगळी वगेळी मागणी एकाने प्रसाद कडे केली आहे.

 

५) प्रसाद आणि मंजिरी नेहमीच एकमेकांसोबत खूप छान वेळ घालवताना दिसतात. त्याचबरोबर ते एकमेकांना त्यांच्या कामातही खूप मदत करतात. याचंच उदाहरण म्हणजे चंद्रमुखी चित्रपट. चंद्रमुखी चित्रपट तयार होत असताना या दोघांनीही एकमेकांना कामात साथ दिली.

 

६) प्रसाद ओक आणि मंजिरी ओक ही जोडी प्रेक्षकांची आवडती जोडी आहे. प्रेक्षक नेहमीच या जोडीवर भरभरून प्रेम करतात.

हे ही वाचा – प्रसाद ओक दिग्दर्शित ‘चंद्रमुखी’ चित्रपटाचा टीजर रिलिज

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -