ब्रिटिश अभिनेते लेस्ली फिलिप्स यांचे वयाच्या 98 व्या वर्षी निधन

प्रदीर्घ आजाराने वयाच्या 98 व्या वर्षी मंगळवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

ब्रिटिश अभिनेते लेस्ली फिलिप्स यांचे वयाच्या 98 व्या वर्षी निधन झाले. लेस्ली फिलिप्स यांना ‘हॅरी पॉटर’ आणि ‘कॅरी ऑन’ यांसारख्या चित्रपटांमधील भूमिकांसाठी ओळखले जाते. मागील बऱ्याच काळापासून ते आजारी होते. प्रदीर्घ आजाराने वयाच्या 98 व्या वर्षी मंगळवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. (British actor Leslie Phillips has died at the age of 98)

80 वर्षांच्या कारकिर्दीत अनेक चित्रपटांमध्ये केले काम
लेस्ली फिलिप्स यांनी ‘हॅरी पॉटर’मधील सॉर्टिंग हॅटला स्वतःचा आवाज दिला. फिलिप्स यांनी 200 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. 80 वर्षांहून अधिक काळ असलेल्या आपल्या करिअरमध्ये फिलिप्स यांनी 200 हून अधिक चित्रपट आणि टीव्ही, रेडिओ मालिकांमध्ये काम केले. व्हरायटीने दिलेल्या वृत्तानुसार, फिलिप्स यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी जारा आहेत.

हे ही वाचा – विक्रमादित्य प्रशांत दामले ! सुख म्हणजे नक्की काय असतं…

फिलिप्स यांचा जन्म 1924 मध्ये झाला
1924 मध्ये फिलिप्स यांचा जन्म झाला. फिलिप्स ब्रिटन आणि अमेरिकेत त्यांच्या आवाजासाठी प्रसिद्ध होते. कॅरी ऑन टीचर, कॅरी ऑन कोलंबस आणि कॅरी ऑन नर्स या चित्रपटांमुळे त्यांना सर्वाधिक प्रसिद्ध मिळाली. याशिवाय ‘डॉक्टर इन द हाऊस’, ‘टॉम्ब रेडर’ आणि ‘मिडसमर मर्डर्स’ या चित्रपटात त्यांनी काम केले.

फिलिप्स यांना बाफ्टा साठी नामांकनसुद्धा मिळाले होते आणि 2006 साली आलेल्या ‘Venus’ चित्रपटात पीटर ओ’टोल या भूमिकेसाठी बाफ्टा पुरस्काराने गौरविण्यात आले.

हे ही वाचा –   देसी गर्लला भेटण्यासाठी देसी बॉयने मारली भिंतीवरून उडी; पोलिसांनी घेतलं ताब्यात