‘बंटी और बबली पार्ट २’ मध्ये अभिषेक बच्चनला ‘या’ कारणामुळे डच्चू

बंटी और बबली पार्ट २ मध्ये अभिनेत्री राणी मुखर्जी आणि बंटीच्या भूमिकेत असलेल्या सैफ अली खानची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. पण बंटी और बबली पार्ट १ मध्ये दमदार भूमिका करणाऱ्या अभिषेकला पार्ट २ मध्ये डच्चू का देण्यात आला याबाबत चाहत्यांमध्ये संभ्रम आहे. तर चित्रपटाच्या पार्ट १ मध्ये राणी आणि अभिषेक यांच्यात झालेली जवळीक हे देखील यामागेच एक कारण असल्याचे बोलले जात आहे.

बंटी और बबली १ या चित्रपटादरम्यान राणी आणि अभिषेक यांच्यात जवळीक निर्माण झाली होती. त्यानंतर दोघांच्या प्रेमसंबंधाच्या चर्चाही रंगल्या होत्या. आता राणी आणि अभिषेक दोघेही विवाहीत असल्याने पुन्हा तसल्या चर्चा नकोत म्हणून राणीचा पती आणि चित्रपट निर्माता, दिग्दर्शक आदित्य चोप्रा याने अभिषेकला डच्चू दिल्याचे बोलले जातय.

तर दुसरीकडे सैफने एका मुलाखतीत सांगितले की दिग्दर्शक आदित्य चोप्रा यांना बंटी और बबली पार्ट २ साठी ओरिजनल स्टार कास्ट नको होती. यामुळे मी तो रोल स्विकारला. सैफने याआधीही यश राज फिल्मबरोबर काम केले आहे.