Video : राखी सावंतच्या मदतीसाठी अंबानी सरसावले, अभिनेत्रीने आभार मानत म्हटले…

business man mukesh ambani to help actress rakhi sawant for her mother treatment

बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंत अतरंगी फॅशन आणि स्टेटमेंटमुळे कायम चर्चेत असते. सध्या ती बॉयफ्रेंड आदिल खानसोबतच्या लग्नामुळे चर्चेचा विषय बनतेय. राखी सावंत बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात सहभागी झाली होती. टॉप 5 फानलिस्टमध्येही ती होती. मात्र 9 लाखांची रोख रक्कम घेऊन तिने पाचव्या स्थानावर समाधान मानले, आणि घराबाहेर पडली. बिग बॉसच्या घरातून बाहेर येताच तिने आपल्या आईच्या आजारपणाबद्दल माहिती दिली.

राखीची आई गेल्या अनेक वर्षांपासून गंभीर आजाराचा सामना करतेय. सध्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. परंतु आईच्या उपचारपणाचा खर्च अधिक असल्याचे सांगत राखीने मदतीसाठी आवाहन केलं आहे. अखेर राखीच्या मदतीला भारतातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी पुढे सरसावले आहेत. याबाबत राखीने त्यांचे जाहीर आभारही मानले आहेत. विरल भय्यानी या इन्स्टाग्राम पेजवरून राखीचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

या व्हिडीओमध्ये राखी सावंत मुकेश अंबानी यांचे जाहीर आभार मानले आहेत. राखी म्हणाली की, माझी आई आजारपणामुळे कोणाला ओळखतही नाही, तिला आम्ही दोन महिन्यांसाठी क्रिटीकेअर रुग्णालयात दाखल केलं आहे. या रुग्णालयाची फी अंबानींमुळे थोडी कमी करण्यात आली आहे. मला मदत केली त्यासाठी मी अंबानींचे आभार मानते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

राखी सावंत गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर बॉयफ्रेंड आदिल खानसोबतच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहे. मात्र बिग बॉसच्या घराबाहेर आल्यानंतर आदिल खान तिच्यासोबत ब्रेकअप केल्याची चर्चा आहे. यानंतर राखीने सात महिन्यांपूर्वी आदिलसोबत लग्न केल्याचाही खुलासा केला. मे महिन्यात आदिलसोबत तिने कोर्ट मॅरेज केल्याचं सर्टिफिकेट जाहीर केलं. पण बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर आदिल राखीसोबत बोलत नसून त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चा रंगत आहेत.


महाराष्ट्रातील गुंतवणूकीसाठी दावोसमध्ये आत्तापर्यंत ८८ हजार ४२० कोटींचे करार