घरमनोरंजनव्यस्तची लाईन जानेवारीत क्लिअर

व्यस्तची लाईन जानेवारीत क्लिअर

Subscribe

मोबाईल बाळगणार्‍या प्रेक्षकांना सर्व लाईन व्यस्त आहेत. हे वाक्य तसे नवीन राहिलेले नाही. प्रत्यक्ष जीवनातही एखाद्या पुरुषात जेव्हा दुसरी स्त्री डोकावते तेव्हा या ओळींचा अर्थ उलगडायला लागतो. प्रदिप रघुनाथ मेस्त्री या दिग्दर्शकाने हीच ओळ शिर्षकासाठी वापरुन चित्रपटाची निर्मिती केलेली आहे. हा चित्रपट 11 जानेवरीला प्रदर्शित होणार आहे. प्रमोशनसाठी जे तंत्र वापरले जाते त्यात टिझर लाँच ही प्रक्रिया महत्त्वाची मांडली जाते. सोशल नेटवर्कवर त्याचा सर्रास वापर झाला की चर्चा व्हायला अधिक मदत होते अणि यात सेलिब्रिटी कलाकार असतील तर प्रेक्षकांत त्यांच्या विषयी कुतूहल निर्माण होते.

प्रेम प्रकरण आणि लग्नअशा विषयात प्रेयसी आणि बायको यांच्यात नेमका काय फरक असतो, ते मजेदाररित्या टिझरमध्ये दाखवलेले आहे. आदर्श शिंदे यांचा स्वर या चित्रपटाला लाभलेला आहे. सिद्धार्थ जाधव, सौरभ गोखले, संस्कृती बालगुडे, स्मिता शेवाळे, हेमांगी कवी यांच्या भन्नाट अभिनयाची झलक यात पाहायला मिळते. प्रेक्षक थक्क होतील असा एक प्रसंग यात चित्रीत केलेला आहे. गुरुच्या भूमिकेत साक्षात महेश मांजरेकर दिसतो. अभिनय आणि डायलॉगबाजी यांचा सुंदर समन्वय साधून महेशनी ही व्यक्तिरेखा खुलवलेली आहे. ‘लाईफ छान एन्जॉय करा’ हे सांगणारं हा चित्रपट आहे. कमलाकर सातपुते, माधवी सोमन, प्रियंका मुंगेकर, शिवाजी रेडकर, गौरव मोरे यांनीही आपला अभिनय पैलू यात चोख दिसेल, असं काम केलेलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -