घरमनोरंजनस्वप्नांचा प्रवास उलगडणारा 'बटरफ्लाय' येतोय २ जूनला!!

स्वप्नांचा प्रवास उलगडणारा ‘बटरफ्लाय’ येतोय २ जूनला!!

Subscribe

सर्वसामान्य कुटुंबातील होममेकरच्या स्वप्नांचा प्रवास ‘बटरफ्लाय’ या चित्रपटातून उलगडणार आहे. उत्तम स्टारकास्ट, कसदार लेखन आणि मीरा वेलणकर यांचं दिग्दर्शन असलेला ‘बटरफ्लाय’ हा चित्रपट २ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आले आहे. ज्येष्ठ अभिनेते, नाट्यनिर्माते अजित भुरे यांनी हा चित्रपट प्रस्तुत केला आहे.

असीम एंटरटेन्मेंट आणि अॅप्रोग्रॅम स्टुडिओज यांनी “बटरफ्लाय” या चित्रपटाची निर्मिती केली आहे. अजित भुरे, अभिजित साटम, मधुरा वेलणकर साटम या चित्रपटाचे निर्माते आहेत. मधुरा वेलणकर साटम यांच्या संकल्पनेला विभावरी देशपांडे यांनी कथेत बांधले आहे. विभावरी देशपांडे आणि मीरा वेलणकर यांनी पटकथा लेखन, तर कल्याणी पाठारे, आदित्य इंगळे यांनी संवाद लेखन केले आहे. वैभव जोशी, गुरू ठाकूर यांनी गीतलेखन, शुभाजित मुखर्जी यांनी संगीत दिग्दर्शन, वासुदेव राणे यांनी छायांकन केले आहे. वैशाली भैसने माडे आणि हंसिका अय्यर यांनी चित्रपटातली गाणी गायली आहेत. या चित्रपटात मधुरा वेलणकर साटम, अभिजित साटम, महेश मांजरेकर, राधा धारणे, सोनिया परचुरे, प्रदीप वेलणकर अशी उत्तम स्टारकास्ट आहे.

- Advertisement -

प्रत्येक व्यक्ती एका उद्देशाने जन्माला येते. विशेषत: ज्या स्त्रिया कुटुंबासाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित करतात, त्या स्वतःची ओळख पूर्णपणे गमावून बसतात. यासर्व गोष्टींमध्ये आयुष्यात अशी एक घटना घडते ज्याने आयुष्याला पूर्णपणे कलाटणी मिळते .बटरफ्लाय म्हणजे पाहिलेले स्वप्न आणि ते पूर्ण करण्याच्या उद्देशाने झटणाऱ्या स्त्रीचा मनोरंजक प्रवास हे “बटरफ्लाय” या चित्रपटाचं कथासूत्र आहे.

सकस लेखन, उत्तम अभिनय आणि तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण असलेल्या चित्रपटाच्या टीजरनं आधीच उत्सुकता निर्माण केली आहे. प्रत्येक घरातल्या होममेकरला आपलीशी वाटणारी ही गोष्ट मोठ्या पडद्यावर पाहणं हा वेगळा अनुभव ठरणार आहे. “बटरफ्लाय” हा चित्रपट २ जूनला प्रदर्शित होणार असल्याने स्वप्नांचा प्रवास उलगडण्यासाठी आता केवळ काही दिवसांचीच प्रतीक्षा करावी लागमार आहे.

- Advertisement -

 


हेही वाचा :

अदा शर्माचा अपघात; ट्वीट शेअर करत दिली प्रकृतीची माहिती

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -