आयुष्याला लखलख लायटिंग करणारा ‘बटरफ्लाय’ ५ मे रोजी होणार प्रदर्शित

जाहिरात, चित्रपट, नाटक, टीव्ही मालिका अशा विविध क्षेत्रात काम केल्यानंतर मीरा वेलणकर आता चित्रपट दिग्दर्शनात पाऊल टाकत आहेत. मीरा वेलणकर दिग्दर्शित बटरफ्लाय या चित्रपटाचा टीजर लाँच करण्यात आला असून, ५ मे रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अत्यंत फ्रेश आणि कलरफुल अशा या चित्रपटाविषयी या टीजरमुळे कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.

'Butterfly' will release on May 5

मीरा वेलणकर हिने आतापर्यंत अनेक नामांकित जाहिरात संस्थांमध्ये काम केले आहे. तिच्या जाहिरातींनी अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कारही पटकावले आहेत. त्याशिवाय मीरा वेलणकर हिने मराठी रंगभूमीवर नटसम्राट, तू तर चाफेकळी, लव्हस्टोरी, आय अॅम नॉट बाजीराव अशा नाटकांमध्ये अभिनय केला आहे.

तसेच पिंपळपान, बंधन, पंखांची सावली या टीव्ही मालिका, प्रेमाची गोष्ट या चित्रपटात देखील मीरा वेलणकर हिने अभिनय केला आहे. तर लव्हस्टोरी, मिस्टर अँड मिसेस, फिर से हनिमून या नाटकांसाठी वेशभूषेची जबाबदारी निभावली आहे. वेगवेगळ्या माध्यमात चतुरस्र काम केल्यानंतर आता ‘बटरफ्लाय’ या चित्रपटाचे दिग्दर्शन करत तिने दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवले आहे.

हेही वाचा – चेंबूर फेस्टिव्हलच्या कार्यक्रमात गायक सोनू निगमवर हल्ला

अभिनेत्री मधुरा वेलणकर साटम आणि अभिजित साटम यांच्या अप्रोग्रॅम स्टुडिओजने ‘बटरफ्लाय’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटात मधुरा वेलणकर साटम, अभिजित साटम, प्रदीप वेलणकर, महेश मांजरेकर, राधा धारणे, सोनिया परचुरे अशी उत्तम स्टारकास्ट आहे. बचरफ्लाय या चित्रपटात विभावरी देशपांडे ह्यांची कथा घेण्यात असून कल्याणी पाठारे आणि आदित्य इंगळे यांनी चित्रपटाचे संवाद लिहिले आहेत. प्रत्येकाच्या मनातल्या फुलपाखराची गोष्ट या चित्रपटातून उलगडण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे. ५ मे रोजी हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित करण्यात येणार आहे. या चित्रपटातील मुख्य अभिनेत्री मधुरा वेलणकर साटम हिने या चित्रपटाचा टीजर आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला शेअर केले आहे.