घरट्रेंडिंगऋषी कपूर यांचे 'हे' ट्वीट ठरलं शेवटचं!

ऋषी कपूर यांचे ‘हे’ ट्वीट ठरलं शेवटचं!

Subscribe

अभिनेते इरफान खान यांच्या निधनाला २४ तास पुर्ण झाले नाही तर बॉलिवूडला आणखी एक धक्का बसला आहे. ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचं मुंबईमध्ये उपचारांदरम्यान निधन झालं आहे. ते ६८ वर्षांचे होते. त्यांच्यावर कर्करोगाचे उपचार सुरू होते. गेल्या दोन वर्षांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, अखेर त्यांची कर्करोगाची ही झुंज अपयशी ठरली आहे. ऋषी कपूर आपल्या अभिनया इतकेच सोशल मीडियावर केलेल्या वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असायचे. अनेकवेळा त्यांनी ट्वीटरवर आपली परखड मतं मांडली आहेत.

हे ट्वीट ठरलं शेवटचं

नुकतच ऋषी कपूर यांनी लॉकडाऊन दरम्यान पोलिस आणि डॉक्टारांवर होणाऱ्या हल्ल्याचा निषेध केला होता. हल्ला करणाऱ्यांन ऋषी कपूर यांनी चांगलेच सुनावले होते. आपण कोरोना विरूध्द लढाई जिंकुयात असं या ट्वीट मध्ये म्हटलं होतं.

- Advertisement -

अनेक वेळा त्यांनी सोशल मीडियावप परखड मत व्यक्त केली. कधी चांगला व्हीडिओ शेअर केला. पण त्यामुळे ते कायम चर्चेत असायचे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -