Monday, July 26, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर मनोरंजन Cannes 2021: रेड कार्पेटवरील मॉडल बेला हदीदचा नेकलेस पाहून सर्व फोटोग्राफर झाले...

Cannes 2021: रेड कार्पेटवरील मॉडल बेला हदीदचा नेकलेस पाहून सर्व फोटोग्राफर झाले चकीत

बेला हदीदला कान्स फेस्टिवलच्या दुसऱ्या दिवशी एका जबरदस्त,स्किन टाइट ब्लॅक आऊटफिटमध्ये पाहून सर्व लोकांची नजर तिच्यावरच खिळून राहिली.

Related Story

- Advertisement -

कान्स फेस्टिवल 2021(cannes 2021) च्या रेड कार्पेटवर सुपर मॉडल बेला हदीदने (bella hadid) सर्वाचे लक्ष वेधून घेतलं आहे. बेला हदीदला कान्स फेस्टिवलच्या दुसऱ्या दिवशी एका जबरदस्त,स्किन टाइट ब्लॅक आऊटफिटमध्ये पाहून सर्व लोकांची नजर तिच्यावरच खिळून राहिली. बेला रेड कार्पेटवर Schiaparelli यांच्या ब्लॅक आऊटफिटमध्ये दिसत आहे. बेलाया स्टायलिश लूकमध्ये अगदी ग्लॅमरस हॉट दिसत आहे. पण बेलाच्या या ड्रेसपेक्षा तिच्या गळ्यातील नेकलेसने जास्त भाव खाल्ला आहे. बेलाचा नेकलेस पाहून सर्वजन चकीत झाले आहेत. बेलाने गोल्ड कलरचा एक सुंदर नेकलेस परिधान केला आहे.तसेच या नेकलेसची रचना मानसाच्या छातीतील फुफुसाप्रमाणे केली आहे.

बेला हदीद

- Advertisement -

24 वर्षीय मॉडेल बेला हदीदने डॅनियल रोझेबेरी (Daniel Roseberry) यांच्या Schiaparelli’s Fall 2021 collection मधील नेकलेस घातला आहे. तसेच हा नेकलेस मानसाच्या फुफुसाला प्रेरीत होउन तयार करण्यात आला असल्याची माहिती समोर येत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Schiaparelli (@schiaparelli)

- Advertisement -

Schiaparelli याने बेला हदीदने घातलेल्या नेकलेसला राइनोस्टोन्सने तयार झालेल्या फुफुसाचे नाव दिले आहे. बेला हदीदच्या या लुकची चर्चा सध्या जगभरात होत आहे. इतकचं नाही तर बेलाचा रेड कार्पेटवरील हा लूक सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.बेला नेहमीच हटके स्टायलिश लूक कॅरी करताना दिसते.

बेला हदीद

कान्स फेस्टिवलच्या रेड कार्पेटटवर बेला हदीद आदल्या दिवशी फिल्म Annette च्या स्क्रीनिंग करीता आली होती. यादरम्यान बेलाच्या स्टयलिश आउटफिटची तूफान चर्चा रंगली होती.हे हि वाचा – बॉलिवूडमध्ये कमबॅक केल्यानंतर ईशा देओलने केलं निर्मिती क्षेत्रात पदार्पण 

- Advertisement -