कान्स फिल्म फेस्टमध्ये अवतरली ऐश्वर्या

बॉलीवूड दिवा ऐश्वर्या राय बच्चनने कान्स मध्ये हजेरी लावली असून तिच्या आरस्पानी सौंदर्यांने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. यामुळे दिपिका पदुकोनपासून हॉलीवूडच्या नायिकाही तिच्या लूकपुढे फिक्या पडत आहे. ऐश्वर्याने २०१८ पासून स्व:ताला पडद्यापासून दूर ठेवले आहे. पण कान्स फिल्म फेस्टीवलमध्ये ऐश्वर्याला पती आभिषेक आणि मुलगी आराध्याबरोबर बघून तिच्या चाहत्यांना मात्र सुखद धक्का बसला आहे.

याच कान्समध्ये ऐश्वर्याला मोठ्या पडद्यापासून लांब राहण्याचा प्रश्न विचारला गेला. त्यावेळी तिने स्वत:ची तुलना proverbial tortoise बरोबर केली. तसेच या वर्षांमध्ये मी स्वतला आणि कुटुंबाला वेळ दिल्याचं ऐशने सांगितले.

त्याचप्रमाणे तिने तिच्या आगामी प्रोजेक्टबदद्ल काही सांगितल नसलं तरी ऐश लवकरच दिग्दर्शक मणि रत्नम यांच्या Ponniyin Selvan मध्ये दिसणार असल्याची चर्चा आहे. ऐश्वर्या सध्या जरी बॉलीवूडपासून लांब असली तरी बॉलीवूड पार्टीज, लग्न, फिल्म फेस्टीवलमध्ये ती झळकत असते.

कान्समध्ये ऐशला बघून तिच्या चाहत्यांना मात्र सुखद धक्का बसला आहे. तिच्या हटके ड्रेस स्टाईलपुढे दिपिका आणि पूजा हेगडे यासारख्या स्टाईल ऑयकॉन हिरोईनही फिक्या पडल्या आहे.