घरमनोरंजनहंसल मेहता दिग्दर्शित 'कॅप्टन इंडिया' सिनेमात कार्तिकची वर्णी,दिसणार पायलटच्या भूमिकेत

हंसल मेहता दिग्दर्शित ‘कॅप्टन इंडिया’ सिनेमात कार्तिकची वर्णी,दिसणार पायलटच्या भूमिकेत

Subscribe

सिनेमात कार्तिक एका रेस्क्यू ऑपरेशनचे नेतृत्त्व करताना दिसणार आहे.

बॉलिवूडमधील ‘प्यार का पंचनामा’ आणि ‘सोनू की टीटू की स्वीटी’ चित्रपटांमधील जबरदस्त अभिनयामुळे लोकप्रिय ठरलेला अभिनेता कार्तिक आर्यन गेल्या काही दिवसांपासून बराच चर्चेत आहे. कार्तिक आर्यन सोशल मीडियावर बराच अँटिव्ह असून तो चाहत्यांसाठी अनेक फोटो शेअर करत असतो. नुकतच कार्तिकने चाहत्यांसाठी आगामी सिनेमाच पोस्टर शेअर करत धमाकेदार सरप्राइज दिलं आहे. कार्तिक लवकरचं प्रेक्षकाचं मनोरंज करण्यास सज्ज झाला आहे. कर्तिकने काही दिवसांपुर्वी एका सिमेमाची घोषणा केली होती या सिनेमाचे नाव ‘कॅप्टन इंडिया’ असे जाहिर करण्यात आलं असून  कार्तिकने समिनेमाचं पोस्टर लाँन्च केलं आहे. तसेच या पोस्टर मध्ये कार्तिक एका रफ अँन्ड टफ लूकमध्ये दिसत आहे. सिनेमाच्या पोस्टरला चाहत्यांकडूनही भरभरून प्रतिसाद मिळत आहे. पोस्टरमध्ये कर्तिकने एका कॅप्टन सारखा ड्रेस परीधान केला आहे. पोस्टरमध्ये एक विमान व काही घरे दिसत आहेत. कार्तिकने फोटो शेअर करत लिहले आहे की, ” जेव्हा एक व्यत्ती आपल्या कर्तव्यापेक्षाही पुढे जाउन विचार करतो, अत्यंत गर्वाने आणि सन्मानाने आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत कॅप्टन इंडिया. हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारीत एक देशभक्ति चित्रपट असणार आहे. सिनेमात कार्तिक एका रेस्क्यू ऑपरेशनचे नेतृत्त्व करताना दिसणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan)

captain india movie directed by hansal mehta will be seen kartik aryan

- Advertisement -

कार्तिकने सध्या सिनेमाच्या रिलीज डेट आणि कोणत्या ओटीटी प्लॅटफॉवर प्रदर्शित होणार आहे याबात काही स्पष्टीकरण दिले नाहीये. तसेच या चित्रपटाचे दिग्दर्शन हंसल मेहता करणार असल्याचे जाहिर करण्यात आले आहे.कार्तिकच्या वर्कफ्रंट बाबतीत बोलायचे झाल्यास ‘दोस्ताना2’ या सिनेमातून कर्तिकची एक्झीट झाल्यानंतर अनेक नेगेटीव्ह न्यूज कर्तिकच्या बाबतीत समोर येत होत्या. तसेच कार्तिक सध्या त्याच्या आगामी सिनेमाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे ‘सत्यनारायण की कथा’,’शहजादा’ ‘भूल भुलैया2’, ‘लुका छुपी 2’ या सिनेमात कार्तिकची वर्णी लागली आहे.


हे हि वाचा – काय सांगताय! सलमान खानचे लग्न झालंय, पत्नी आणि सतरा वर्षीय मुलगी दुबईत आहेत

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -