घरताज्या घडामोडीमहात्मा गांधी बदनामी प्रकरण, अभिनेत्री पायल रोहतगीवर पुण्यात गुन्हा दाखल

महात्मा गांधी बदनामी प्रकरण, अभिनेत्री पायल रोहतगीवर पुण्यात गुन्हा दाखल

Subscribe

अभिनेत्री पायल रोहतगी विरोधात पुणे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महात्मा गांधी आणि काँग्रेस परिवाराची बदनामी केल्याप्रकरणी पायलवर पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कलम १५३(अ), ५००, ५०५ (२) आणि ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पायलने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करून यामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी, माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप तिच्यावर केला आहे.

पुणे जिल्हा काँग्रेसच्या सरचिटणीस संगीता तिवारी यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अभिनेत्री पायल रोहतगीविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी व्हिडिओ बनवल्यामुळे पायल रोहतगीसह इतर एका अज्ञात आरोपी विरोधात तक्रार दाखल केली आहे.

- Advertisement -

सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये पायल रोहतगीने महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधींसह काँग्रेस परिवार यांच्याविषयी खोटे बदनामीकारक वक्तव्य केले आहे. यामुळे दोन समाजामध्ये तेढ निर्माण होण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो असे म्हणतं संगीता तिवारी यांनी तक्रार दाखल केली आहे. यापूर्वी संगीता तिवारी यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर सायबर पोलिसांनी ही तक्रार शिवाजीनगर पोलिसांकडे सुपूर्द केली आहे.

यापूर्वी पायल रोहतगीने काँग्रेस आणि नेहरू घराण्यावर टीका केली होती आणि त्यावेळेस याप्रकरणी तिला अटक करण्यात आली होती. मग तिने माफी मागितली. पण पुन्हा वादग्रस्त वक्तव्य करून पायल वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – KBC 13: हिमानी बुंदेला यांना विचारण्यात आलेला 7 कोटींचा प्रश्न कोणता होता माहितेय का?


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -