घरमनोरंजनबबीताजीच्या संकटात वाढ,अॅट्रोसिटी अॅक्ट अंतर्गत मुनमुन दत्ता विरोधात गुन्हा दाखल !

बबीताजीच्या संकटात वाढ,अॅट्रोसिटी अॅक्ट अंतर्गत मुनमुन दत्ता विरोधात गुन्हा दाखल !

Subscribe

पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तसेच मुनमुनच्या वादग्रस्त वक्तव्या विरोधात दलित समजतील लोकांकडून अजाक पोलिस स्टेशन समोर धरणे आंदोलन आणि घोषणाबाजी देखील करण्यात आली.

प्रसिद्ध टेलिव्हीजन अभिनेत्री ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ फेम बबीता जी म्हणजेच मुनमुन दत्ता समोर आता भले मोठे संकट उभे राहिले आहे. आता मुनमुन दत्ता विरोधात इंदौर मधील अजाक पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तसेच मुनमुनच्या वादग्रस्त वक्तव्या विरोधात दलित समजतील लोकांकडून अजाक पोलिस स्टेशन समोर धरणे आंदोलन आणि घोषणाबाजी देखील करण्यात आली.दलित नेता मनोज परमार यांनी मुनमुन विरोधात गुन्हा दाखल केला आहे. 12 मे रोजी अभिनेत्री विरोधात अॅट्रोसिटी अॅक्ट अंतर्गत केस फाइल करण्यात आलीआहे .देशभरातून मुनमुन दत्ता हिला अटक करण्याची मागणी करण्यात येत आहे. तसेच ट्विटरवर सुद्धा काही दिवसांपूर्वी #ArrestMunmunDutta हा टॅग सध्या प्रचंड ट्रेंडिंग झाला होता.

- Advertisement -

का होतेय मुनमुन दत्ताला अटक करण्याची मागणी ?
मुनमुन दत्ताने सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ पोस्ट केला होता. या पोस्ट मध्ये मुनमुन दत्ताने विशिष्ट जाती वर काही अपमानजनक शब्दांचा उल्लेख केला होता. मुनमुनच्या विवादीत वक्तव्यानंतर लोकांमध्ये रोष निर्माण झाल्यामुळे . मुनमुन वर जातीयवादाचा आरोप लावण्यात येत आहे. लोकांचा वाढता राग पाहता मुनमुन दत्ताने घडलेल्या घटनेची सविस्तरपणे माफी मागितली होती. तसेच मुनमुन दत्ताने स्पष्टीकरण देत ट्विटरवर लिहलं होतं की ,”मी सगळ्या लोकांचा सन्मान करते. तसेच मी व्हिडिओचा वादग्रस्त भागही काढून टाकला आहे. काल मी पोस्ट केलेल्या व्हिडिओ दरम्यान मी वापरलेल्या शब्दाचा चुकीचा अर्थ लावला गेला आहे.त्या व्हिडिओ मागचा उद्धेश हा कोणाचीही भावना दुखावणे, धमकावणे, अपमानित करणे किंवा दुखापत करण्याचा नव्हता. माझ्या भाषेच्या अडथळ्यामुळे मला या शब्दाच्या अर्थाबद्दल चुकीचे माहिती देण्यात आली होती. मला त्याचा अर्थ कळाला आहे. मी व्हडिओ मधून ताबडतोब तो वादग्रस्त भाग काढून टाकला आहे. मला समाजातील प्रत्येक जाती, धर्म, लिंग, प्रत्येक व्यक्तीबद्दल आदर आहे आणि त्यांचे समाज किंवा राष्ट्रातील अपार योगदान मी स्वीकारते.


हे हि वाचा – भारतातील कोरोनाबाधितांकरिता प्रियांका चोप्राने जमा केले तब्बल 22 कोटी रुपये !!

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -