घरमनोरंजनAdipurush: 'रामा'वर वादग्रस्त वक्तव्य; सैफ अली खान विरोधात गुन्हा दाखल

Adipurush: ‘रामा’वर वादग्रस्त वक्तव्य; सैफ अली खान विरोधात गुन्हा दाखल

Subscribe

'आदिपुरुष' या चित्रपटाचे चित्रिकरण जानेवारी २०२१ पासून सुरु होणार

ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. यूपीच्या जौनपूर जिल्ह्यातील वकिलाने चित्रपटाचे अभिनेता सैफ अली खान आणि दिग्दर्शक ओम राऊत यांच्याविरोधात सीजेएम व्ही.च्या कोर्टात दावा दाखल केला आहे. दिवाणी न्यायालयाचे वकील हिमांशू श्रीवास्तव यांच्या वतीने दाखल केलेल्या खटल्यात धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप त्यांनी केला. यावर सुनावणीसाठी कोर्टाने २३ डिसेंबरची मुदत दिली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saif Ali Khan (@actorsaifalikhan)

- Advertisement -

दरम्यान, दिवाणी न्यायालयाचे वकील हिमांशु श्रीवास्तव यांनी वकील उपेंद्र विक्रम सिंग यांच्यामार्फत याचिका दाखल केली असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचिकेत असे म्हटले आहे की, ६ डिसेंबर रोजी सैफने एका मुलाखतीत सीताहरणाला न्याय्य ठरवले होते. यासह सीताहरणाच्या मुद्द्यावरुन त्यानं रावणाच्या भूमिकेचं उदात्तीकरण केल्याचा आरोप केला होता.

- Advertisement -

ते म्हणाले की, सैफ अली खानची मुलाखत सनातन धर्माच्या विश्वासाला दुखावते. सनातन धर्माची चुकीची माहिती दिली जात आहे. यामुळे त्याच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. फिर्यादीने आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. ‘आदिपुरुष’ या चित्रपटाचे चित्रिकरण जानेवारी २०२१ पासून सुरु होणार असून या चित्रपटात दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास रामाच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -