Friday, February 26, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन पुण्यात साजरा होतोय चक्क घटस्फोट सोहळा

पुण्यात साजरा होतोय चक्क घटस्फोट सोहळा

सोशल मिडियावर घटस्फोट सोहळ्याची जोरदार चर्चा सुरु आहे.

Related Story

- Advertisement -

सध्या सोशल मिडियावर नेटिजन्समध्ये पुण्यातील घटस्फोट सोहळ्याची जोरदार चर्चा सुरु आहे. हल्ली लोक काय करतील त्याचा काही नेम नाही. घटस्फोट सोहळ्याच्या व्हायरल झालेल्या सोहळ्याने नेटिजन्सना नाही तर साऱ्या महाराष्ट्राला आश्चर्यचकित केले आहे. एवढंच बाकी राहीलं होत,पुणे तिथे काय उणे, आता हे ही पाहायला मिळालं,लोक कशाचे सोहळे करतील सांगता येत नाही, पाटलाचा नादच खुळा, अशा कमेंट्सने सोशल मिडियावर धुमाकूळ घातला आहे. घटस्फोट सोहळ्याची लग्न सोहळ्याप्रमाणे थाटामाटात सुरु असलेली तयारी पाहून सर्वांनाच प्रश्न पडले आहेत.

नक्की प्रकार काय आहे ?

सोशल मिडियावर घटस्फोट सोहळ्याबाबत अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत. परंतू हा खऱ्याखुऱ्या आयुष्यातील सोहळा नसून हा एका चित्रपटाचा भाग आहे. हा चित्रपट म्हणजे ‘मंगलाष्टक रिटर्न’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मंगलाष्टक वन्स मोअर नंतर मंगलाष्टक रिटर्न हा आगळावेगळा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तरी घटस्फोट सोहळा दाखवत चित्रपटात नक्की काय मांडले आहे. याबाबत आता प्रेक्षकांच्या उत्सुकता वाढल्या आहेत. दिग्दर्शक योगेश भोसले दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती निर्माता वीरकुमार शहा यांनी केली आहे.

मंगलाष्टक रिटर्नमध्ये दिसणार ‘हे’ कलाकार

- Advertisement -

हिंजवडी पुणे येथे मंगलाष्टक रिटर्न या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे. मंगलाष्टक रिटर्न चित्रपटात अभिनेता प्रसाद ओक, कमलेश सावंत, अभिनेत्री श्वेता खरात, प्रसन्ना केतकर, शीतल अहिरराव अभिनेता सुनील गोडबोले, समीर पौलस्ते अभिनेत्री प्राजक्ता नेवळे, सोनल पवार,भक्ती चव्हाण, शीतल ओस्वाल आनंद इंगळे, सक्षम कुलकर्णी, वृषभ शहा हे कलाकार या चित्रपटात पाहायला मिळणार आहेत.


हेही वाचा – वनमंत्री संजय राठोड पोहरादेवीला रवाना, समर्थकांचे जोरदार शक्तीप्रदर्शन

- Advertisement -