Celebrity wedding : अभिनेत्री मौनी रॉय लग्नबंधनात अडकणार ; लग्नासाठी ठरले ‘हे’ ठिकाण

अखेर हा दोघांचा लग्नसोहळा 27 जानेवारीला संपन्न होणार आहे. दोघांनी लग्नाचे ठीकाण ठरवले असून, हे एक बीच वेडिंग असणार आहे. या विवाहसोहळ्यात कुटूंब आणि बिझनेसमधील काही लोक सहभागी होणार आहेत. दोघेही दुबईत नाही तर, गोवा येथे लग्नसोहळा करण्याचे प्लॅनिंग करत आहेत. या लग्नासंबंधित गुप्तता पाळण्याचे मौनी रॉयने सांगितले आहे.

celebrity wedding: Actress Mauni Roy to get married; This is the place for marriage
celebrity wedding : अभिनेत्री मौनी रॉय लग्नबंधनात अडकणार ; लग्नासाठी ठरले 'हे' ठिकाण

सध्या लग्नसराईचा काळ सुरु आहे. यंदा या लग्नसराईच्या काळात अनेक सेलिब्रिटी विवाहबंधनात अडकणार आहेत. त्यातच आता सोशल मिडियावर जास्त सक्रिय असणारी नागिन फेम अभिनेत्री मौनी रॉय लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. मौनी रॉय तिचा बॉयफ्रेंड सूरज नांबियारसोबत सात फेरे घेणार आहेत.अनेक दिवसांपासून यांच्या लग्नाच्या चर्चा सोशलमिडियावर रंगलेल्या पाहायला मिळत आहेत. अखेर हा दोघांचा लग्नसोहळा 27 जानेवारीला संपन्न होणार आहे. दोघांनी लग्नाचे ठीकाण ठरवले असून, हे एक बीच वेडिंग असणार आहे. या विवाहसोहळ्यात कुटूंब आणि बिझनेसमधील काही लोक सहभागी होणार आहेत. दोघेही दुबईत नाही तर, गोवा येथे लग्नसोहळा करण्याचे प्लॅनिंग करत आहेत. या लग्नासंबंधित गुप्तता पाळण्याचे मौनी रॉयने सांगितले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by mon (@imouniroy)


मौनी रॉयच्या लग्नासाठी एक फाईव्ह स्टार रिसॉर्ट बुक करण्यात आला आहे. काही दिवसांपासून लग्नासाठी आमंत्रण पाठवली जात आहेत. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. या लग्नाला उपस्थित राहणाऱ्यांनी लसीकरणाचे प्रमाणपत्र सोबत ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. या लग्नासाठी गोव्यातील वॅगेटोर बीचवरील डब्ल्यू गोवा रिसॉर्ट बुक करण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा संपन्न होणार आहे, अशी माहिती अभिनेत्री मौनी रॉयच्या जवळच्या मित्रमैत्रिणींनी दिली आहे.

लग्नानंतर 28 जानेवारीला डान्स फंक्शन असणार आहे. ज्यामध्ये मौनी रॉयचे जवळचे मित्र आणि डान्स रिअॅलिटी शोचे प्रतीक उतेकर आणि राहुल शेट्टी परफॉर्म करणार असल्याची माहिती समोर येत आहे. लग्नात एकता कपूर, डिझायनर मनीष मल्होत्रा, आशिका गोराडिया यांच्यासह अनेक मौनीचे जवळचे मित्र सहभागी होणार आहेत.हे दोघेही आता लग्नाच्या बेडीत अडकणार असून लग्नाच्या तयारीला सुरुवात झाली आहे.


हेही वाचा – Loop Lapeta: लूप लपेटाचा ट्रेलर आऊट, तापसी अन् ताहिर राज भसीन मुख्य भूमिकेत