घरमनोरंजनचैतू आणि चिमीचे दिवाळी सरप्राईज - 'जाऊ दे नं वं’

चैतू आणि चिमीचे दिवाळी सरप्राईज – ‘जाऊ दे नं वं’

Subscribe

२०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या सुधाकर रेड्डी यंकट्टी दिग्दर्शित ‘नाळ’ या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. त्यातील निरागस ‘चैतू’ सर्वांनाच आवडला. आणि विशेष गाजले ते जयस कुमार यांनी गायलेले आणि ए. व्ही. प्रफुल्लचंद्रा यांचे बोल आणि संगीत लाभलेले ‘जाऊ दे नं वं’ हे जबरदस्त गाणे. आज इतक्या वर्षानंतरही या गाण्याची लोकप्रियता कायम आहे. दिवाळीत ‘नाळ भाग २’ प्रदर्शित होत असून या चित्रपटातील गाणीही प्रेक्षकांच्या भेटीला आली. ‘भिंगोरी’ आणि ‘डराव डराव’ या गाण्यांना प्रचंड व्ह्यूज मिळत आहेत. यावरून ही गाणीही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताहेत, हे कळतेय. मात्र लोकांना उत्सुकता लागून राहिली आहे ती, ‘जाऊ दे नं वं’ हे सुपरहिट गाणं या चित्रपटात ऐकायला आणि पाहायला मिळणार का, याची.

- Advertisement -

नुकताच ‘नाळ भाग २’च्या टीमचा चित्रीकरणादरम्यान सुरु असलेल्या पडद्यामागची धमालचा व्हिडीओ प्रदर्शित झाला आहे. या दरम्यान मागे ‘जाऊ दे नं वं’ हे गाणे वाजत आहे. त्यामुळे आता हे गाणे चित्रपटात असणार का? याचे उत्तर प्रेक्षकांना १० नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहात मिळणार आहे. दरम्यान झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे निर्मित ‘नाळ भाग २’मध्ये श्रीनिवास पोकळे, नागराज मंजुळे, देविका दफ्तरदार, दीप्ती देवी, त्रिशा ठोसर आणि जितेंद्र जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

 

- Advertisement -

हेही वाचा :

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -