…म्हणून निलेश साबळेंनी केंद्रीय मंत्री नारायण राणेंची पाय धरुन मागितली माफी

चला हवा येऊ द्या संपूर्ण टीम कडून अशाप्रकारची चूक पुन्हा कधीही होणार नाही', असे आश्वासन देत निलेश साबळे यांनी नारायण राणे यांची पाय धरुन माफी मागितली.

chala hava yeu dya team nilesh sable apologize to union minister narayan rane
...म्हणून निलेश साबळेंनी केंद्रीय मंत्री नारायण राणेंची पाय धरुन मागितली माफी

संपूर्ण महाराष्ट्राला खळखळवून हसवणारा लाडका कार्यक्रम म्हणजे ‘चला हवा येऊ द्या’. दमदार सादरीकरणे आणि निखळ मनोरंजन करुन प्रेक्षकांना हसवणारा हा कार्यक्रम सतत चर्चेत असतो मात्र यावेळी कार्यक्रम वादाच्या भोवऱ्यात अडकला असून कार्यक्रमाचे दिग्दर्शक आणि सूत्रसंचालक निलेश साबळे यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची पाय धरुन माफी मागावी लागली. नुकताच दिवाळीनिमित्त हवा येऊ द्याच्या मंचावर झालेल्या ‘दिवाळी अधिवेशन’ कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे हुबेहुब पात्र साकारण्यात आले. या पात्राने राणे समर्थक मात्र दुखावले गेले आणि त्यांनी याचा तीव्र निषेध व्यक्त केला. त्यामुळेच हवा येऊ द्याची संपूर्ण टीम आणि सूत्रसंचालक निलेश साबळे यांनी नारायण राणेंची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन राणेंची पाय धरुन माफी मागितली.

 

‘दिवाळी निमित्त करण्यात आलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पात्र साकारण्यामागचा आमचा हेतू स्वच्छ होता. यातून कोणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नव्हता. चला हवा येऊ द्या संपूर्ण टीम कडून अशाप्रकारची चूक पुन्हा कधीही होणार नाही’, असे आश्वासन देत निलेश साबळे यांनी नारायण राणे यांची पाय धरुन माफी मागितली. या भेटी दरम्यान आमदार नितेश राणे देखील उपस्थित होते.

या आधी देखील चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. ९ मार्च २०२० रोजी दाखवण्यात आलेल्या एका एपिसोडमध्ये अभिनेता भाऊ कदम आणि कुशल बद्रिके एक अभिनय करत होते. त्यावेळी त्यांच्या हातात राजश्री शाहू महाराज आणि सयाजीराव गायकवाड यांचे फोटो होते. ते फोटो एटीड करुन त्यांच्या जागी भाऊ आणि कुशल यांचे फोटो लावण्यात आले होते. या प्रकारानंतर सोशल मीडियावर ट्रोलींग झाले होते. संभाजीराजे छत्रपती यांनी देखील या प्रकारचा संताप व्यक्त करत कलाकारांनी जाहीर माफी मागण्याची मागणी केली होती.


हेही वाचा – Pandu Trailer: बहुचर्चित ‘पांडू’ चित्रपटाचा ट्रेलर लॉंच