‘कोण होणार करोडपती’च्या नव्या पर्वात विजेत्याला २ कोटी जिंकण्याची संधी

ज्याप्रमाणे हिंदीमधील "कौन बनेगा करोडपती" या कार्यक्रमाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले त्याचप्रमाणे मराठीमधील "कोण होणार करोडपती" या कार्यक्रमाने देखील अगदी कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात जागा केली आहे. या कार्यक्रमाचे नवीन पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

chance for the winner to win 2 Crores in the new season of 'Kon Honar Crorepati'

ज्याप्रमाणे हिंदीमधील “कौन बनेगा करोडपती” या कार्यक्रमाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले त्याचप्रमाणे मराठीमधील “कोण होणार करोडपती” या कार्यक्रमाने देखील अगदी कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात जागा केली आहे. या कार्यक्रमाचे नवीन पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

ज्ञान आणि बुद्धी यांच्या जोरावर करोडपती होण्याची अनोखी संधी देणार्‍या ‘कोण होणार करोडपती’ या कार्यक्रमाचा नवीन सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यंदाच्या सिझनचं वैशिष्ट्य म्हणजे विजेत्याला २ करोड रुपये जिंकण्याची संधी मिळणार आहे. मनोरंजनासोबत ज्ञानार्जन हे वैशिष्ट्य असणार्‍या या कार्यक्रमात ज्ञान तुम्हांला यशाच्या उत्तुंग शिखरावर घेऊन जाऊ शकतं याची प्रचिती मागील पर्वामध्ये सगळ्यांना आली आहे. यंदाही ‘कोण होणार करोडपती’ या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रसिद्ध अभिनेते सचिन खेडेकर करणार आहेत.

करोडपती होण्याचं स्वप्न प्रत्येक जण पाहतो, पण सर्वसामान्यांचं हे स्वप्न सत्यात उतरण्याची संधी सोनी मराठी वाहिनी पुन्हा एकदा घेऊन येणार आहे. सोनी मराठी वाहिनीवरील ‘कोण होणार करोडपती’च्या आधीच्या सगळ्या सिझन्सला स्पर्धकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला होता. अभिनय कौशल्याबरोबरच सचिन खेडेकर सहभागी स्पर्धकांशी प्रेमळ संवाद साधून त्यांना दिलासा देण्याचे काम उत्तमरित्या करतात.

दरम्यान ‘कोण होणार करोडपती’ या कार्यक्रमात सहभागी होण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होईल. दरवर्षीप्रमाणे मिस्डकॉल देऊन किंवा सोनी लिव्ह ॲपवर जाऊन प्रेक्षक सहभागी होण्यासाठी नोंदणी करून घेऊ शकतात. यंदाच्या सिझनमध्ये काय वेगळेपण असेल, स्पर्धक कसे असतील, २ करोड रुपये कोणी जिंकू शकेल का? हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे.

हेही वाचा – आयुष्याला लखलख लायटिंग करणारा ‘बटरफ्लाय’ ५ मे रोजी होणार प्रदर्शित

नेमके कधी हा कार्यक्रम प्रसारित करण्यात येणार आहे? याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. पण लवकरच या खेळात सहभागी होण्याची प्रक्रिया सुरु करून या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.