Maharashtra Assembly Election 2024
घरमनोरंजनRapper Badshah : रॅपर बादशाहच्या चंदीगडमधल्या नाइट क्लबबाहेर स्फोट

Rapper Badshah : रॅपर बादशाहच्या चंदीगडमधल्या नाइट क्लबबाहेर स्फोट

Subscribe

प्रसिद्ध गायक आणि रॅपर बादशाहच्या मालकीच्या चंदीगडमधील दोन नाईट क्लबबाहेर स्फोट झाले. मंगळवार ( 26 नोव्हेंबर रोजी) पहाटे 2.30 ते 2.45 वाजेदरम्यान चंदीगढ सेक्टर 26 मध्ये एका नाईट क्लबजवळ स्फोट झाला, त्यानंतर परिसरात गोंधळ उडाला आहे. स्फोटानंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

सुदैवाने या घटनेत कोणतीची जीवितहानी झाली नाही. मात्र स्फोटामुळे क्लबच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत. त्यामुळे मालमत्तेचं बरंच नुकसान झालं आहे. स्फोटाबद्दलची माहिती मिळताच चंदीगड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. डीएसपी दिलबाग सिंह यांनी सांगितले की, सेक्टर-26 पोलिस ठाण्यासमोरून हे दोन आरोपी आले. आरोपींनी दुचाकी स्लिप रोडवर पार्क केली. सर्वप्रथम त्यांनी सेव्हिल बार अँड लाउंजच्या बाहेर देशी बॉम्ब फेकला. त्यानंतर ते डिओरा क्लबबाहेर बॉम्ब फेकण्यासाठी गेले. या दोन्ही क्लबमध्ये अवघे 30 मीटरचे अंतर आहे.

- Advertisement -

‘इंडिया टुडे’नं दिलेल्या वृत्तानुसार, आरोपींनी खंडणीच्या उद्देशाने हा कमी तीव्रतेचा स्फोट घडवून धमकी देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या घटनेमागे खंडणीच्या अँगलचाही पोलिस तपास करत आहेत. गुंडांनी चंदीगडमधील अनेक क्लब चालकांकडून पैसे उकळले असून, अनेकांना धमक्याही मिळाल्या आहेत. अशा परिस्थितीत वसुली हा या घटनेमागचा हेतू असू शकतो. आरोपींना पकडण्यासाठी आणि स्फोटामागील उद्देश जाणून घेण्यासाठी पोलीस पुढील तपास करत आहेत.

याचदरम्यान आता बिश्नोई यांच्या निकटवर्तीय गोल्डी ब्रार यांनी स्फोटाची जबाबदारी स्वीकारली असल्याची माहिती समोर येत आहे. लॉरेन्स बिश्नोई यांच्यावर प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मूसवाला यांच्या हत्येचाही आरोप आहे. याशिवाय काही दिवसांपूर्वी सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणातही त्याचे नाव पुढे आले होते. त्याचबरोबर माजी आमदार आणि सलमानचा जवळचा सहकारी बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी लॉरेन्स बिश्नोईचाही हात असल्याचे बोलले जात आहे.

- Advertisement -

रॅपर बादशाहने गेल्या वर्षी 2023 ला डिसेंबरमध्ये सेव्हिल क्लब उघडला. स्फोट झाला तेव्हा नाईट क्लब बंद होते. दहशत पसरवण्यासाठीच हे स्फोट घडवून आणल्याचा अंदाज आहे. त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 डिसेंबरला चंदीगडला येत आहेत. त्यामुळे पोलीस सतर्क आहेत. या घटनेने पोलिसांचा ताण वाढला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -