घरताज्या घडामोडीHarnaaz Kaur Sandhuला ग्लॅमरस दुनियेत नव्हे तर, 'या' क्षेत्रात करायचंय करिअर

Harnaaz Kaur Sandhuला ग्लॅमरस दुनियेत नव्हे तर, ‘या’ क्षेत्रात करायचंय करिअर

Subscribe

‘मिस युनिव्हर्स २०२१’चा किताब मिळवणारी हरनाज कौर संधू मंगळवारी चंदीगढमध्ये पोहोचली. शहरवासियांनी तिचे जोरदार स्वागत केले. जग प्रतिष्ठीत सौंदर्यस्पर्धा ‘मिस युनिव्हर्स २०२१’चा किताब जिंकल्यानंतर हरनाज कौर पहिल्यांदा चंदीगडमध्ये आली. त्यानंतर बुधवारी हरनाज संधूने माध्यमांशी संवाद साधला. त्यापूर्वी तिने पंजाबचे नवे मुख्यमंत्री भगवंत मान यांची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना तिने हिजाबच्या मुद्द्यावर आपले मत मांडले आणि आपल्या करिअरबाबत सांगितले.

- Advertisement -

हरनाज कौरने आपल्या पुढील करिअरबाबत खुलासे केले. हरनाजने म्हटले की, ‘तिला ग्लॅमरस दुनियेत करिअर करायचे नसून इंडियन एडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस (आयएएस) बनायचे आहे. आयएएस अधिकारी होऊन तिला देशासाठी काहीतरी करायचे आहे.’

हिजाबच्या मुद्द्यावर बोलत असताना हरनाज म्हणाली की, ‘जर एखादी मुलगी हिजाब घालते, तर ती तिची पसंती आहे. जर कोणी तिच्यावर दबाव टाकत असेल तर तिने पुढे येऊन बोलले पाहिजे. मुलीला जसे जगायचे आहे, तसेच जू द्या. आपण विविध संस्कृतींच्या महिला आहोत आणि आपल्याला एकमेकांचा सन्मान करणे गरजेचे आहे.’

- Advertisement -

मुख्यमंत्री भगवंत मान यांच्याबाबत ती पुढे म्हणाली की, ‘मुख्यमंत्री भगवंत मान स्वतः थिएटर आर्टिस्ट राहिले आहेत. त्यांच्या कामामुळे मी त्यांच्यावर पूर्वीचे प्रभावित झाली होती. आज जेव्हा मी त्यांना भेटली तेव्हा पंजाबसाठी विविध मुद्द्यांवर काम करण्याची प्रेरणा मिळाली. पूर्वी त्यांना पाहून अॅक्टिंग करत होते, परंतु आता त्यांच्याप्रमाणे पंजाबासाठी काम करू इच्छिते. पंजाबमध्ये नशा करण्याची समस्या खूप जास्त आहे. ज्यावर काम करणे गरजेचे आहे. मी नशामुक्त पंजाब करण्यासाठी जे काही करावे लागेल ते करेन. यासोबत पंजाबमध्ये मी महिला सशक्तीकरणाच्या दिशेन काम करेन.’


हेही वाचा – एक्स गर्लफ्रेंड सोमी अलीची ‘भाईजान’ला धमकी; म्हणाली, ‘एक दिवस तुझा भांडाफोड होणार’


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -