चंदिगढच्या एका व्यावसायिकाने बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan), त्याची बहिण अलवीरा खान अग्निहोत्री (Alvira Khan Agnihotri), बीइंग ह्यूमन (Being Human)कंपनीचा सीईओ आणि इतर अधिकाऱ्यांविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. व्यावसायिकाने २ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे.
व्यावसायिक अरुण गुप्ता (Arun Gupta)ने पोलिसात तक्रार दाखल करताना सांगितले की, बीइंग ह्यूमन कंपनीने चंदिगढच्या मनिमाजरामध्ये त्याच्याकडून २ कोटी रुपये खर्च करून एक शोरूम उघडले. त्यानंतर त्याला सामान पाठविले नाही आणि कंपनीची वेबसाईट देखील बऱ्याच वेळेसाठी बंद पडली. त्याने केलेल्या तक्रारीवर कंपनीने कोणतेही उत्तर दिले नाही.
या व्यावसायिकाने लेखी करार (Written Agreement) झाल्याचा दावा केला आहे. तक्रारीत अरुण गुप्ता यांनी सांगितले की, बीइंग ह्यूमनच्या ज्वेलरी ब्रँडला स्टाईल क्विटेंट ज्वेलरी प्रायव्हेट लिमिटेड (Style Quotient Jewellery Private Limited) नावाची एक कंपनी चालवते. त्यांच्या शोरुममध्ये सर्व वस्तू बीइंग ह्यूमन कंपनीच्या आहेत.
After opening showroom, we have not received any spot. They called us for a meet-and-greet with Salman Khan. I met him and he promised me. Now 1.5 years have passed and I have not received anything. Salman did not reply to my letters: Arun Gupta
— ANI (@ANI) July 8, 2021
अरुण याने दिलेल्या माहितीनुसार, त्याने २०१८ साली शोरूम सुरू केले होते. सलमान खानने बिग बॉसच्या शोमध्ये एकदा चंदिगढमध्ये त्याने बीइंग ह्यूमन ज्वेलरीचे शोरूम सुरू केल्याचे सांगितले आहे. याच व्हिडिओची क्लिप व्यावसायिकाने पोलिसांना दिली आहे. त्याने आपल्या कुटुंबियांसोबतचा सलमान खानचा फोटो देखील पोलिसांना दाखवला आहे. सलमानच्या विश्वासावर त्याने एवढ्या मोठ्या रक्कमेची गुंतवणूक केली होती. या शोरूम ओपनिंगच्या वेळी स्वतः सलमान खान उपस्थित राहणार होता, पण तो व्यस्त असल्यामुळे जाऊ शकला नाही. त्यामुळे सलमानने बहिणीचा नवरा आयुष शर्माला ओपनिंगसाठी पाठवले.
आता याप्रकरणी पोलिसांनी समन्स बजावला आहे. चंदिगढ एसपी सिटी पोलिस केतन बंसल म्हणाले की, ‘सलमान खान, त्याची बहिण अलवीरासह बीइंग ह्यूमन आणि ज्वेलरी प्रायव्हेट लिमिटेडच्या अधिकाऱ्यांना समन्स बजावला आहे. १३ जुलैला हजर होऊन जबाब देण्यासाठी सांगितले आहे. जर त्यांच्याकडून उत्तर आले नाही, तर पुढे कायदेशीर कारवाई केली जाईल.’
हेही वाचा – आर्थिक अडचणीशी सामना करणाऱ्या शगुफ्ता अलीच्या मदतीला धावू आला रोहित शेट्टी