घरमनोरंजनचंद्रकांत कुलकर्णी झाले स्वप्नील जोशीचे काका

चंद्रकांत कुलकर्णी झाले स्वप्नील जोशीचे काका

Subscribe

नाजूक नात्यांचा गुंफलेला हा गजरा म्हणजेच ‘मोगरा फुलला’! या  चित्रपटातील नायकाच्या म्हणजे सुनील कुलकर्णीच्या काकाची भूमिका साकारत आहेत. हे सुनीलच्या खूप जवळचे असे पात्र आहे.

‘मोगरा फुलला’ या स्वप्नील जोशीची मुख्य भूमिका असलेल्या मराठी चित्रपटात दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी एका वेगळ्या भुमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटात ते स्वप्निलच्या काकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. ‘मोगरा फुलला’ १४ जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

नाजूक नात्यांचा गुंफलेला हा गजरा म्हणजेच ‘मोगरा फुलला’! या  चित्रपटातील नायकाच्या म्हणजे सुनील कुलकर्णीच्या काकाची भूमिका साकारत आहेत. हे सुनीलच्या खूप जवळचे असे पात्र आहे. दिग्दर्शक अशी ओळख असलेल्या चंद्रकांत कुलकर्णी यांनी या चित्रपटामध्ये सुद्धा एका दिग्दर्शकाचीच भूमिका साकारली आहे. ‘पैशांनी श्रीमंत होणं सोपं, नात्यांनी समृद्ध होण कठीण’ या टॅगलाइनसह नुकतेच एक पोस्टर या चित्रपटाच्या निर्मात्यांनी प्रकाशित केलं  आहे. त्यात स्वप्नील आणि चित्रपटात त्याचे काका झालेले चंद्रकांत कुलकर्णी हे स्कूटरवर स्वार झाले आहेत. त्यांची केमिस्ट्री त्यातून व्यक्त होते.

 ‘सिनेमा आणि नाट्यसृष्टीत माझी ओळख एक दिग्दर्शक म्हणूनच आहे. ज्यावेळी कोणताही दिग्दर्शक किंवा लेखक एखादा मराठी चित्रपट करत असतो, आणि त्याला एखाद्या भूमिकेविषयी असा ठाम विश्वास वाटतो की ही भूमिका फक्त चंद्रकांत कुलकर्णीच करू शकतात त्याचवेळी मी ती भूमिका करतो. तसच काहीसं ‘मोगरा फुलला’ या चित्रपटच्या बाबतीत झालं आहे. सिनेमाचे लेखक सचिन मोटे यांना असा ठाम विश्वास होता.- चंद्रकांत कुलकर्णी,दिग्दर्शक

- Advertisement -

 

दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी १९९५ साली आलेल्या अमोल पालेकर दिग्दर्शित ‘बनगरवाडी’ या चित्रपटामध्ये अभिनय केला होता. त्याचबरोबर २०१२ साली प्रदर्शित झालेल्या ‘पिपाणी’ या चित्रपटात चंद्रकांत कुलकर्णी यांना शेवटचा अभिनय करताना पहायला मिळाले होते. त्यानंतर आता‘मोगरा फुलला’ या चित्रपटात अभिनय करणार आहेत. चंद्रकांत कुलकर्णी मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील नामवंत दिग्दर्शक आहेत. ‘आजचा दिवस माझा’ या मराठी चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. त्याआधी त्यांनी १९९४ साली महेश एलकुंचवार लिखित ‘वाडा चिरेबंदी’, `मग्न तळ्याकाठी’ आणि `युगान्त’ या त्रिनाट्याचे दिग्दर्शन केले आहे. चार मध्यांतरासह सलग नऊ तासांचा हा नाट्यप्रयोग होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -