घर मनोरंजन Chandrayaan-3: सुशांत सिंह ते टॉम क्रुज यांनी खरेदी केलीयं चंद्रावर जमीन 

Chandrayaan-3: सुशांत सिंह ते टॉम क्रुज यांनी खरेदी केलीयं चंद्रावर जमीन 

Subscribe

Chandrayaan-3: आज सर्वांचे लक्ष इस्रोच्या चांद्रयान-३ वर लागून राहिले आहे. देशच नव्हे तर जगभराचे लक्ष या महत्त्वाकांक्षी मिशनकडे लागले आहे. भारताचे मून मिशन म्हणजेच चांद्रयान-३ चे लँन्डर संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे. सकाळपासूनच सोशल मीडियात ते टीव्ही चॅनलवर केवळ याच बद्दलच्या बातम्या दिल्या जात आहेत. देशभरातील मंदिरात ही यासाठी पूजा केली जात आहे. मात्र तुम्हाला माहितेय का, असे काही कलाकार आहेत ज्यांनी चंद्राचा तुकडा खरेदी केला आहे. यामध्ये सुशांत सिंह राजपूत ते टॉम क्रुज सारख्या कलाकाराचे नाव आहे.

सुशांत सिंह राजपूत

- Advertisement -


सुशांत सिंह राजपूतला चंद्र-तारे पाहण्याचे वेड होते. असे सांगितले जाते की, त्याने चंद्राच्या दुसऱ्या बाजूला जमीनीचा एक तुकडा खरेदी केला होता. जो तुकडा खरेदी केला त्याला ‘मसकोवीचा सागर’ असे म्हटले जाते. सुशांतने ही जमीन इंटरनॅशनल लूनर लँन्ड्स रजिस्ट्रीकडून खरेदी केली होती.

शाहरुख खान
शाहरुख खानला आपल्या चाहत्याकडून हे एक अनोखे गिफ्ट मिळाले आहे. त्याच्या एका फॅनने त्याच्यासाठी चंद्रावर एक हिस्सा खरेदी केला आहे. त्याचा हा फॅन ऑस्ट्रेलियात राहतो.

- Advertisement -

प्रियंका चाहर चौधरी आणि अंकित गुप्ता


‘उडारिया’ मालिकेतून सर्वांच्या मनावर आपली छाप पाडणाऱ्या प्रियंका चाहर चौधरी आणि अंकित गुप्ताला त्यांच्या एका फॅनने चंद्रावर जमीन खरेदी करून ती गिफ्ट केली होती. याचा व्हिडिओ या दोघींनी शेअर सुद्धा केला होता.

टॉम क्रुज
हॉलिवूड मधील प्रसिद्ध कलाकार टॉम क्रुजची सुद्धा भारतात तगडी फॅनफॉलोअर्स आहेत. त्याने आपल्या करियरमध्ये काही पुरस्कार मिळवले आहेत. तो जगातील हाइएस्टद पेड अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याने सुद्धा चंद्रावर जमीन खरेदी केली आहे.

निकोल किडमॅन
निकोल किडमॅन ही एक अभिनेत्री, प्रोड्युसर आणि गायक आहे. तिने एक एकेडमी, दोन प्राइमटाइम एमी आणि पाच गोल्डन ग्लोब अवॉर्ड जिंकले आहेत. तिने 2006, 2018 आणि 2019 मध्ये जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या कलाकारांच्या लिस्टमध्ये आपले नाव कोरले. तिच्याकडे सुद्दा चंद्रावरील जमीन आहे.


हेही वाचा- चांद्रयान-3 यशस्वी होणारच, पण ‘या’ व्यक्तीचा विसर पडता कामा नये; आर माधवनची पोस्ट चर्चेत

- Advertisment -