Break Up Day : ब्रेकअप डे साठी मराठी रॅप साँग

विनय प्रतापराव देशमुख आणि रुचिरा जाधव या जोडीचं #BreakUpAnthemOfTheYear ‘चांगली खेळलीस तू’ हे मराठी ब्रेकअप रॅप साँग नुकतेच लाँच करण्यात आले. 

Changali Khellis Tu new mrathi rap song for Breack Up Day

“प्रेम हे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी ‘सेम’ असतं” असं अनेकजण म्हणायचे पण खरंच सगळ्यांचं प्रेम सेम असतं का? जर प्रेम सेम असेल तर ब्रेकअप पण सेम असतं का? मनापासून जोडलेलं नातं जेव्हा तुटतं किंवा ब्रेकअप होतं तेव्हा त्या व्यक्तीला काय वाटत असेल… ती व्यक्ती मनाने किती खचून गेली असेल… असंच काहीसं झालंय अभिनेता विनय प्रतापराव देशमुख याच्यासोबत आणि म्हणूनच तो बोलतोय “चांगली खेळलीस तू… भावनांशी माझ्या चांगली खेळलीस तू…!”

‘किस्सा घर प्रॉडक्शन्स’, ‘मिडीया वर्क्स स्टुडियो’ यांच्या सहकार्याने प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन आले आहेत. विनय प्रतापराव देशमुख आणि रुचिरा जाधव या जोडीचं #BreakUpAnthemOfTheYear ‘चांगली खेळलीस तू’ हे मराठी ब्रेकअप रॅप साँग नुकतेच लाँच करण्यात आले.

गाण्याचा हिरो आणि हिरोईन यांच्यातील सीन्स, रॅप साँगचे शब्द, एकंदरीत संपूर्ण गाणं पाहता ते प्रेक्षकांना नक्की आवडेल असा विश्वास वाटतो. दुःख आलं की ते कुरवाळत बसायचं की त्यातून स्वतःला घडवायचं हे तुम्हाला या गाण्याचा शेवट पाहिल्यावर कळेल. या गाण्यात प्रेक्षकांसाठी एक सुंदर, गोड सरप्राईज पण आहे आणि ते सरप्राईज म्हणजे अभिनेत्री सायली संजीव. सायली संजीव या गाण्यात ‘सायली संजीव’च्याच भूमिकेत दिसणार आहे. आता गाण्यात सायलीची एन्ट्री नेमकी कशी होते हा एक ट्विस्ट आहे जो गाणं पाहिल्यावरच प्रेक्षकांना कळेल.

तसेच या गाण्यात आपल्या सर्वांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या व्यक्तीवर देखील नजर टाकण्यात आली आहे जी खरंतर वस्तुस्थिती आहे आणि ती व्यक्ती आहे आपली आई. ब्रेकअप झाल्यावर आईचं महत्त्व समजतं, तिच्या कुशीत जाऊन मनमोकळं रडावंसं वाटतं, आईसाठीच्या भावना या गाण्यात दाखवल्या आहेत. एकंदरीत हे गाणं इमोशन्सने भरलेलं आहे. गाण्याच्या टीमने गाण्याच्या मार्फातून दाखवलेली प्रत्येक गोष्ट ही प्रेक्षकांना पटली आहे याचा पुरावा म्हणजे फक्त दोन दिवसांत या गाण्याला २ लाखांहून जास्त व्ह्युज मिळाले आहेत.


हेही वाचा – Bappi Lahiri Love Gold : बप्पी दांची पहिली चैन ते गोल्ड मॅन…