घर मनोरंजन सिंगल मदर असल्याने चारुला घर मिळेना, अभिनेत्री म्हणाली...

सिंगल मदर असल्याने चारुला घर मिळेना, अभिनेत्री म्हणाली…

Subscribe

टेलिव्हिजन वरील अभिनेत्री चारु असोपा सध्या एका नव्या घराच्या शोधात आहे. पण तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. तिने असे म्हटले आहे की, ती सिंगल मदर आणि अभिनेत्री असल्याने तिला घर मिळवण्यात खुप अडचणी येत आहेत. खरंतर चारु ही अभिनेत्री सुष्मिता सेनचा भाऊ राजीव सेन याची बायको आहे. मात्र गेल्या काही दिवसांसापासून चारू आणि राजीव यांच्या वैवाहिक आयुष्यात अडचणी निर्माण झाल्याने दोघांन घटस्फोटाचा निर्णय घेतलाय.

पुढे तिने असे म्हटले की, जरी तिला एखादे घर आवडले तरीही लोक तिला मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते. नवऱ्याशिवाय ही कशी राहणार असे सुद्धा तिला बोलले जातेय. मुलगी मोठी होत असल्याने आता घराची गरज आहे असे चारुने म्हटलेय. तर एका ठिकाणी फ्लॅट आवडला सुद्धा होता. पण तेथील लोकांनी सुद्धा सिंगल मदर असल्याने फ्लॅट देण्यास नकार दिला. माझ्या आणि मुलीच्या एकटे राहण्यावर खुप आक्षेप घेतला जात आहे असे ही ती म्हणाली.

- Advertisement -

दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून राजीव पासून चारु वेगळी राहत आहे. चारु आणि राजीव यांचे लग्न २०१९ मध्ये झाले होते. लग्नाच्या दोन वर्षांनी चारुने एका मुलीला जन्म दिला. सुरुवातीला सर्वकाही उत्तम सुरु होते. परंतु नंतर दोघांमध्ये वाद वाढू लागले होते.


- Advertisement -

हेही वाचा- Jiah Khan Case : राबिया खान उच्च न्यायालयात जाणार

- Advertisment -