सेफ झाला शेफ, करिनासाठी बनवले पंचपक्वान्न

करीना कपूरच्या Alexandra Galligan या मैत्रिणीने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर करीनाचे आणि सैफ अली खानचे काही फोटो शेअर केले आहेत

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर आणि अभिनेता सैफ अली खान सध्या आपल्या दोन्ही मुलांसोबत इंग्लंडमध्ये सुट्ट्या एन्जॉय करत आहेत. करीना आणि सैफने रविवारी आपल्या मित्रांसोबत खास वेळ घालवला. एकीकडे करीना आपल्या मुलासोबत आणि मित्रांसोबत छान वेळ घालवताना दिसतेय तर दुसरीकडे सैफ अली खान स्वयंपाक घरात जेवण बनवत आहे.

करीना करतेय मित्रांसोबत धम्माल

करीना कपूरच्या Alexandra Galligan या मैत्रिणीने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर करीनाचे आणि सैफ अली खानचे काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये हा सर्व प्रकार तुम्हाला पाहायला मिळेल.

सैफ अली खानने केला स्वयंपाक

करीनाची मैत्रिण Alexandra Galligan ने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर सैफ अली खानचे सुद्धा काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये सैफ अली खान स्वयंपाक घरात जेवण बनवताना दिसत आहे. Alexandra Galligan ने शेअर केलेल्या एका फोटोमध्ये करीनाचा धाकटा मुलगा जेह सुद्धा दिसत आहे, तर दुसऱ्या फोटोमध्ये सैफ अली खान त्याच वेळी स्वयंपाक घरात जेवण बनवत आहे.


हेही वाचा :रणवीर सिंह होणार शाहरूखचा शेजारी 119 कोटींमध्ये खरेदी केलं नवं घर