घरट्रेंडिंगआलिया-बिग बींची 'केमिस्ट्री' ! शेअर केले खास क्षण

आलिया-बिग बींची ‘केमिस्ट्री’ ! शेअर केले खास क्षण

Subscribe

नुकत्याच आलेल्या ‘राझी’ सिनेमातून आपल्या दमदार अभिनयाची छाप पाडणारी आलिया भट्ट सध्या यशाची चव चाखतेय. आलियाने आजवर बॉलीवूडमध्ये एकाहून एक सरस सिनेमे केले आहेत. विशेष म्हणजे प्रत्येक सिनेमातून आपल्या अभिनयाच्या जोरावर तिने तुफान लोकप्रियताही मिळवली आहे. सध्या आलिया तिच्या ‘ब्रह्मास्त्र’ आणि ‘कलंक’ या दोन आगामी सिनेमांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. ब्रह्मास्त्र सिनेमाच्या सेटवरचा एक खास फोटो आलियाने नुकताच सोशल मीडियावर शेअर केला आहे. सध्या सगळीकडे या फोटोची चांगलीच चर्चा रंगतेय

आलियाची बिग बींसोबत जुळली केमिस्ट्री

करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनची निर्मिती असलेल्या ‘ब्रह्मास्त्र’ या सिनेमात आलिया भट्ट आणि रणबीर कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. ही जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र काम करते आहे. विशेष म्हणजे बॉलीवडूचे महानायक अमिताभ बच्चन देखील या सिनेमात प्रमुख भूमिका साकारणार आहेत. या निमित्ताने आलिया आणि बिग बी देखील पहिल्यांदाच सिल्व्हर स्क्रीनवर एकत्र काम करत आहेत. नुकताच या सिनेमाच्या सेटवरील एक फोटो आलियाने इन्स्टाग्रामवर शेअर केला असून त्यामध्ये तिच्यासोबत अमिताभ बच्चन आणि रणबीर कपूरही आहेत. खास अमिताभ यांच्यासाठी ‘कॅप्टन ओ कॅप्टन.. प्रिपरेशन्स विथ लेजंड’ असं कॅप्शन देत आलियाने हा फोटो शेअर केला आहे.

- Advertisement -
फोटो सौजन्य- आलिया भट्ट इंस्टाग्राम
अमिताभ यांनीही केले ‘खास’ क्षण शेअर

दरम्यान, अमिताभ बच्चन यांनीही ‘ब्रह्मास्त्र’च्या सेटवरील काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. आलिया रणबीर आणि अयान मुखर्जीसोबत बिग बींनी केलेली धमाल-मस्ती आपल्याला या फोटोंमध्ये पाहायला मिळत आहे. नेटिझन्सकडून या फोटोंना सोशल मीडियावर भरभरुन पसंती मिळत आहे.

फोटो सौजन्य- अमिताभ बच्चन इंस्टाग्राम
फोटो सौजन्य- अमिताभ बच्चन इंस्टाग्राम
कधी लॉन्च होणार ‘ब्रह्मास्त्र’

आयान मुखर्जीचं दिग्दर्शन असलेला ‘ब्रह्मास्त्र’ हा सिनेमा यावर्षीच्या ऑक्टोबर महिन्यात रिलीज होणार असल्याचं बोललं जात आहे. मात्र, याआधी ब्रह्मास्त्र १५ ऑगस्ट रोजी रिलीज होणार असल्याच्या चर्चांनाही उधाण आलं होतं. सिनेमाच्या टीमकडून मात्र अद्याप प्रदर्शनाच्या तारखेविषयी कोणताच ठोस खुलासा करण्यात आलेला नाही. मोठ्या पडद्यावर पहिल्यांदाच एकत्र झळकणाऱ्या अमिताभ, आलिया आणि रणबीरच्या त्रिकुटाला प्रेक्षक कशी पसंती देतात? हे येणारी वेळच सांगेल.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -