Saturday, March 22, 2025
27 C
Mumbai
HomeमनोरंजनChhaava 2 : छावा 2 येणार, शंभूराजांची अधुरी कहाणी पूर्ण होणार

Chhaava 2 : छावा 2 येणार, शंभूराजांची अधुरी कहाणी पूर्ण होणार

Subscribe

विकी कौशलचा ‘छावा’ हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करतोय. रिलीजपासून सिनेमाच्या कमाईचा वेग दिवसागणिक वाढताना दिसतोय. या सिनेमात छत्रपती संभाजी महाराजांची जीवनगाथा दर्शवली आहे. त्यामुळे ‘छावा’ आता केवळ सिनेमा नव्हे तर कित्येकांसाठी भावनिक विषय ठरला आहे. अशातच आता सोशल मीडियावर ‘छावा 2’ हा सिनेमा येणार असल्याचे बोलले जात आहे. आता यात किती तथ्य आहे? ते जाणून घेऊया. (Chhaava 2 is coming actor anoop singhs statement goes viral)

सोशल मीडियावर ‘छावा 2’ येणार अशा चर्चांनी जोर धरलाय आणि याचं कारण ठरतंय अभिनेता ठाकूर अनुप सिंगचे वक्तव्य. बॉलिवूडचा ‘छावा’ हा सिनेमा येण्यापूर्वी 2024 मध्ये ‘धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज’ हा मराठी चित्रपट आला होता. या चित्रपटात अभिनेता ठाकूर अनुप सिंगने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली होती. येत्या काळात याच चित्रपटाचा दुसरा भाग प्रदर्शित होणार असल्याचे अभिनेत्याने एका मुलाखतीत सांगितले आहे. विकी कौशलच्या ‘छावा’विषयी बोलताना अनुप सिंगने आपल्या चित्रपटाचा दुसरा भाग येत असल्याचे सांगितले.

एका मुलाखतीत बोलताना अनुप सिंग म्हणाला, ‘मी विकी कौशलचा मोठा चाहता आहे. त्याचा सॅम बहादूर सिनेमा पाहिलात तर कळेल त्याने ती भूमिका हुबेहूब साकारली आहे. त्यामुळे जेव्हा छावा सिनेमात विकी कौशल छत्रपती संभाजी महाराज साकारतोय समजलं तेव्हा माझी उत्सुकता वाढली. त्याने ही भूमिका कशी साकारली असेल? हे पाहण्यासाठी मी आतुर झालो. दरम्यान, त्यांनी एकाच सिनेमात छत्रपती संभाजी महाराजांचे पूर्ण आयुष्य दाखवलंय. पण आम्ही त्यासाठी 2 भाग केले. कारण इतक्या महान व्यक्तीचे चरित्र तुम्ही ३ तासांत काय आणि किती दाखवू शकाल? त्यामुळे आम्ही डिटेलिंगमध्ये चित्रपट बनवतोय आणि दोन्ही सिनेमांत फक्त तेव्हढाच फरक आहे.

पुढे म्हणाला, ‘छावा सिनेमा पाहिल्यानंतर ”धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज” या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाला प्रेक्षकांचा आणखी चांगला प्रतिसाद मिळेल असं मला वाटतं. हा सिनेमा रिलीज होणार म्हणून आम्ही दुसऱ्या भागाची घोषणा केली असं यात काहीही नाही. आम्ही दोन वर्षांपूर्वीचं हा चित्रपट सविस्तर स्वरूपात 2 भागात दाखवायचा ठरवले होते. त्यावेळी आम्ही ‘छावा’ सिनेमाबद्दल ऐकलंसुद्धा नव्हतं’. यावेळी अनुपने असंही सांगितलं की, ‘येत्या काळात मला आणखी ऐतिहासिक भूमिका साकारण्याची संधी मिळाली तर मी त्यादेखील साकारेन’. ‘धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज’ या मराठी चित्रपटात अभिनेता ठाकूर अनूप सिंगसोबत अमृता खानविलकर (महाराणी येसुबाई), प्रदीप रावत, भार्गवी चिरमुले आणि आनंद पिंपळकर या कलाकारांच्यादेखील महत्वपूर्ण भूमिका आहेत.

हेही पहा –

Ranragini Tararani : रणरागिणी ताराराणी नाटकाचा दिमाखदार शुभारंभ