Thursday, March 27, 2025
27 C
Mumbai
HomeमनोरंजनChhaava Box Office Collection : विकी कौशलच्या छावाने ओलांडला 300 कोटींचा टप्पा

Chhaava Box Office Collection : विकी कौशलच्या छावाने ओलांडला 300 कोटींचा टप्पा

Subscribe

अभिनेता विकी कौशलच्या ‘छावा’ सिनेमाची रिलीजपासूनच बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई सुरु आहे. 14 फेब्रुवारी 2025 रोजी प्रदर्शित झालेला हा सिनेमा आता रिलीजनंतर 10 व्या दिवशी देखील अनेक ठिकाणी हाऊसफुल सुरू आहे. त्यामुळे अवघ्या दहा दिवसांत या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 300 कोटी रुपये कमाईचा टप्पा ओलांडल्याचे समजत आहे. विकी कौशलच्या कारकिर्दीतील ‘छावा’ हा पहिलाच 300 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री घेणारा सिनेमा ठरलाय. (Chhaava Box Office Collection crossed 300 crore on 10th day)

दुसऱ्या विकेंडलाही ‘छावा’ हाऊसफुल्ल

विकी कौशल, रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना स्टारर ‘छावा’ या सिनेमाला प्रेक्षकांची उदंड प्रतिसाद दिला अजूनही देत आहेत. रिलीजच्या दहाव्या दिवशीसुद्धा या सिनेमाचे हाऊसफुल शो सुरू आहेत. रिपोर्टनुसार, विकी कौशलच्या या सिनेमाने रिलीजच्या सात दिवसांत बॉक्स ऑफिसवर 225.28 कोटींची कमाई केली होती. यात पहिल्या आठवड्यात 200 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री घेतल्यानंतर आठव्या दिवशी या सिनेमाने 24.03 कोटी रुपयांचा गल्ला केला. पुढे नवव्या दिवशी अर्थात दुसऱ्या शनिवारी ‘छावा’च्या कमाईत आणखी वाढ झाल्याचे दिसले.

रिलीजनंतर नवव्या दिवशी या सिनेमाने तब्बल 44.1 कोटींची रेकॉर्डब्रेकिंग कमाई केली. शिवाय रिलीजनंतर दुसऱ्या विकेंडला रविवारी या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तब्बल 40 कोटींचा गल्ला जमवला. अशा प्रकारे ‘छावा’ने रिलीजच्या दहाव्या दिवशी जबरदस्त कलेक्शन करून 300 कोटींच्या क्लबमध्येएन्ट्री केली आहे. माहितीनुसार, छावाने आतापर्यंत 333.41 कोटी इतकी कमाई केली असून लवकरच तो बॉक्स ऑफिसवर 500 कोटींच्या यादीत समावेश करेल असा अंदाज व्यक्त केला जातोय.

गेल्या आठवड्याभरात न केवळ मुंबई तर पुणे आणि चेन्नईमध्येसुद्धा ‘छावा’चे हाऊसफुल्ल शो पहायला मिळाले. या सिनेमाने दहाव्या दिवशी पुण्यात 85.75%, मुंबईत 75.25% आणि चेन्नईत 83.25% अशी सर्वाधिक कमाई केली आहे.

हेही पहा –

Arunoday Singh Divorced : कुत्र्यामुळे मोडला प्रसिद्ध अभिनेत्याचा 3 वर्षांचा संसार, नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या