Saturday, March 15, 2025
27 C
Mumbai
HomeमनोरंजनChhaava Film : छावामध्ये दिसणार अजय देवगण? प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

Chhaava Film : छावामध्ये दिसणार अजय देवगण? प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

Subscribe

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ हा सिनेमा उद्या 14 फेब्रुवारी रोजी सर्वत्र थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या सिनेमातून छत्रपती संभाजी महाराजांची जीवनगाथा रुपेरी पडद्यावर दाखवली जाणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर पहिल्यापासून प्रेक्षक सिनेमाबाबत उत्सुक होते. अखेर त्यांची प्रतीक्षा आता संपणार आहे. या सिनेमात विकी कौशल, रश्मिका मंदाना आणि अक्षय खन्ना मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. यासोबतच आता छावामध्ये अजय देवगण झळकणार असल्याची चर्चा सुरू आहे. याविषयी सविस्तर जाणून घेऊया. (Chhaava Film Update Ajay Devgn Playing Important Role in it)

निर्मात्यांकडून प्रेक्षकांना सरप्राईज

मिळालेल्या माहितीनुसार, बहुप्रतीक्षित ‘छावा’ त्या सिनेमात अजय देवगण अत्यंत महत्वाची भूमिका साकारणार आहे. अर्थात एक अभिनेता म्हणून तो दिसेल का? तर नाही. छावामध्ये अजय देवगणचा आवाज ऐकू येणार आहे. होय. या सिनेमाला आणखी रंजक बनवण्याची जबाबदारी अजय देवगणच्या खांद्यांवर टाकण्यात आली आहे. त्याच्या आवाजामुळे सिनेमाच्या कथानकाचे सादरीकरण आणखी जबरदस्त होईल. या सिनेमासाठी अजय देवगणने त्याचा दमदार आवाज दिला आहे. छावाचे कथानक चालू असताना काही सीन्ससाठी आवश्यक असणारा व्हॉइस ओव्हर अजय देवगणने दिलाय. विशेष म्हणजे त्याचे व्हॉईस ओव्हरचे काम सिनेमाच्या कथानकात प्रेक्षकांना गुंतवून ठेवण्यास मदत करेल.

बॉक्स ऑफिस ‘छावा’ गाजवणार?

उद्या सर्वत्र थिएटरमध्ये प्रदर्शित होण्यापूर्वी या सिनेमाच्या तिकिटांची ऍडव्हान्स बुकिंग सुरू केली होती. 9 फेब्रुवारीपासून सुरु झालेल्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगदरम्यान या सिनेमाच्या तिकिटांची प्रचंड विक्री झाली. ज्यातून रिलीजआधीच या सिनेमाचा गल्ला कोट्यवधींनी भरला. आतापर्यंत छावाने 10 कोटी रुपये कमावल्याचा अंदाज आहे. यानुसार प्रदर्शनानंतर हा सिनेमा बॉक्स ऑफिस गाजवेल, अशी शक्यता वर्तवली जातेय. अशातच आता अजय देवगणच्या भूमिकेचा देखील उलगडा झाला आहे. त्यामुळे सिंघमचे फॅन्सदेखील छावा पाहण्यासाठी आतुर झाले आहेत.

अजय देवगणने साकारलाय तान्हाजी

अभिनेता अजय देवगणने त्याच्या कारकिर्दीत तान्हाजी ही ऐतिहासिक भूमिका साकारली आहे. 10 जानेवारी 2020 रोजी प्रदर्शित झालेल्या ‘तान्हाजी’ या सिनेमातील मध्यवर्ती भूमिकेत त्याने काम केले होते. त्याने साकारलेल्या तान्हाजीला प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळाले. शिवरायांच्या मावळ्याची भूमिका साकारल्यानंतर आता छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर भाष्य करणाऱ्या या सिनेमाशी त्याचे खास कनेक्शन जुळले आहे.

हेही पहा –

Sachin Pilgaonkar : माझ्याकडे काम नाही, सचिन पिळगांवकरांनी व्यक्त केली मनातली खदखद