लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ हा सिनेमा सध्या सर्वत्र चर्चेत आहे. येत्या शुक्रवारी अर्थात 14 फेब्रुवारी 2025 रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. टिझर, ट्रेलर, कलाकारांचे फर्स्ट लूक पाहिल्यानंतर प्रेक्षकांमध्ये सिनेमाबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. जो तो सिनेमाच्या फर्स्ट डे फर्स्ट शोसाठी आतुर होता. प्रेक्षकांचा हा उत्साह अॅडव्हान्स बुकिंगमध्ये अगदी दिसून आला आहे. 9 फेब्रुवारीपासून सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगची सुरुवात करण्यात आली आणि अगदी 72 तासांत तिकीट विक्रीचा मोठा आकडा समोर आला. यानुसार छावा बॉक्स ऑफिस गाजवणार हे नक्की झाले आहे. (Chhaava Movie Advance Booking received overwhelming response from audience)
अॅडव्हान्स बुकिंगमध्ये कोट्यवधींचा गल्ला
‘छावा’ सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगसाठी प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. 14 फेब्रुवारीला प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगची सुरुवात झाल्यापासून तिकीट विक्रीचा ओघ चांगला दिसून आलाय. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या 3 दिवसांत या सिनेमाची एकूण 3 लाख तिकिटांची विक्री झाली आहे.
View this post on Instagram
यानुसार आतापर्यंत केवळ अॅडव्हान्स बुकिंगमधून ‘छावा’ या सिनेमाने तब्बल 7.3 कोटींची कमाई केली आहे. यावरून प्रदर्शनाआधीच प्रेक्षकांचा इतका चांगला प्रतिसाद आहे तर प्रदर्शनानंतर काय होईल? याची उत्सुकता बळावली आहे.
जबरदस्त स्टारकास्ट
‘छावा’ या ऐतिहासिक कलाकृतीच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराज यांची जीवनगाथा दाखवली जाणार आहे. या भूमिकेत बॉलिवूड अभिनेता विकी कौशल झळकणार आहे. तर महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत अभिनेत्री रश्मिका मंदाना झळकणार आहे. तसेच औरंगजेबाच्या भूमिकेत अभिनेता अक्षय खन्ना झळकणार आहे. याशिवाय सिनेमात आशुतोष राणा, दिव्या दत्ता, विनीत कुमार सिंह, डायना पेन्टी हे कलाकारदेखील महत्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. बॉलिवूड कलाकारांसोबत यामध्ये अनेक मराठी कलाकारदेखील झळकले आहेत. ज्यामध्ये संतोष जुवेकर, सुव्रत जोशी, सारंग साठ्येसारख्या कलाकारांचा समावेश आहे.
अॅडव्हान्स बुकिंगमध्ये छावा इतर सिनेमांना धोबीपछाड देताना दिसतोय. दरम्यान, ब्लॉक सीट्सना पकडून ‘छावा’ने आतापर्यंत 7.3 कोटींची कमाई केली आहे आणि जाऊनही २ दिवस बाकी असल्याने येत्या काळात बुकिंगमध्ये किती वाढ होणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. अॅडव्हान्स बुकिंगची सध्या वाढती आकडेवारी ‘छावा’चं क्रेझ दाखवते आहे. मुख्य म्हणजे न केवळ महाराष्ट्रात तर ‘छावा’साठी तामिळनाडू आणि तेलंगणा राज्यांमध्येही अॅडव्हान्स बुकिंगचा जोर वाढतोय. निर्मात्यांनी या उदंड प्रतिसादासाठी पोस्ट शेअर करत प्रेक्षकांचे आभार मानले आहेत.
हेही पहा –
Salman Khan : ब्रेकनंतर लगेच मूव्हऑन करा, युथसाठी सलमानचा कानमंत्र