Sunday, March 16, 2025
27 C
Mumbai
HomeमनोरंजनChhaava Movie : महिलांसाठी छावाच्या FREE शोजचे आयोजन, कधी आणि कुठे?

Chhaava Movie : महिलांसाठी छावाच्या FREE शोजचे आयोजन, कधी आणि कुठे?

Subscribe

शुक्रवारी संपूर्ण राज्यभरात ‘छावा’ हा सिनेमा प्रदर्शित झाला. या सिनेमातून छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्यातील अत्यंत महत्वाच्या घटनांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या सिनेमात अभिनेता विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. तर महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत रश्मिका मंदाना आणि औरंगजेबाच्या भूमिकेत अक्षय खन्ना झळकला आहे. अनेक ठिकाणी या सिनेमाचे शो हाऊसफुल सुरू असताना आता महिलांना हा सिनेमा मोफत पाहता येणार आहे. कधी, केव्हा आणि कुठे? याविषयी सविस्तर जाणून घेऊया. (Chhaava Movie Free Shows For Women In Ahilyanagar)

महिलांना मोफत पाहता येणार छावा

छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा सांगणारा ‘छावा’ हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करतोय. या सिनेमाची जोरदार चर्चा सुरू असून प्रेक्षकांची सिनेमा पहायला मोठी गर्दी होताना दिसतेय. दरम्यान, अहिल्यानगरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी ‘छावा’ संदर्भात एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय. संपूर्ण महिला वर्गाला हा सिनेमा पाहता यावा म्हणून आमदार संग्राम जगताप यांनी चित्रपटाचे काही शो मोफत आयोजित केले आहेत. याबद्दल त्यांनी स्वतः माहिती दिली आहे.

‘छावा’ चित्रपटाचे मोफत शोज

आमदार संग्राम जगताप यांनी मोफत शोजविषयी माहिती देताना सांगितले, ‘छत्रपती संभाजी महाराजांच्या धगधगत्या इतिहासातून महिला भगिनींना प्रेरणा मिळावी म्हणून अहिल्यानगर येथील महिलांसाठी बहुचर्चित ”छावा” चित्रपटाच्या मोफत शोचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व महिला भगिनींनी छत्रपती संभाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास नक्की अनुभवा. हे शो 17 फेब्रुवारीपासून सोमवार ते शनिवार कॉनप्लेक्स थिएटर, कोहिनूर मॉल येथे (दुपारी 4:30 वाजता) आणि सिनेलाईफ थिएटर, नगर कॉलेजजवळ, झूडीओवर अहिल्यानगर येथे (दुपारी 3:30 वाजता) आयोजित करण्यात आला आहे’.

दरम्यान, ‘छावा’बद्दल बोलायचं झालं तर हा सिनेमा या वर्षातला सुपरहिट सिनेमा ठरताना दिसतोय. बॉक्स ऑफिसवर अवघ्या तीन दिवसांत या सिनेमाने 100 कोटींपेक्षा जास्त कमाई करून 121 कोटींचा गल्ला जमवला आहे. या सिनेमाला मिळणारा प्रतिसाद पाहता कलाकारांनी आपल्या भूमिकांना योग्य तो न्याय देण्यासाठी घेतलेली मेहनत प्रेक्षकांपर्यंत पोहोचली आहे, असे म्हणायला हरकत नाही. विकी कौशल, रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना, आशुतोष राणा, डायना पेंटी, विनीत सिंह, संतोष जुवेकर, नीलकांती पाटेकरसारखे दमदार कलाकार या सिनेमात झळकले आहेत. येत्या काळात हा सिनेमा आणखी चांगली कामगिरी करेल, अशी आशा आहे.

हेही पहा –

Suniel Shetty : केसरी वीर- लेजेंड्स ऑफ सोमनाथमध्ये सुनील शेट्टी साकारतोय महत्वाची भूमिका