येत्या काळात प्रेक्षकांना एक दर्जेदार ऐतिहासिक सिनेमा पाहायला मिळणार आहे. या सिनेमाचे नाव ‘छावा’ असे आहे. ज्यामधून नॅशनल क्रश रश्मिका मंदाना एका जबरदस्त भूमिकेतून आपल्या भेटीस येण्यासाठी सज्ज आहे. अलीकडेच तिच्या पात्राचे पहिले पोस्टर समोर आले आहे. सोशल मीडियावर तिच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले असताना आता अभिनेता अक्षय खन्नाच्या भूमिकेचा फर्स्ट लूक समोर आला आहे, जो पाहून सगळेच थक्क झाले आहेत. या सिनेमात अक्षय खन्ना औरंगजेबाच्या भूमिकेत दिसणार आहे.
औरंगजेबाच्या भूमिकेत झळकणार अक्षय खन्ना
‘छावा’ सिनेमाच्या टीमने मुघल शहंशाह औरंगजेबाच्या भूमिकेत असलेल्या अक्षय खन्नाच्या लूकचे पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये स्पष्ट दिसून येत आहे की, या भूमिकेला न्याय देण्यासाठी अक्षय खन्नाने चांगलेच कष्ट घेतले आहेत. त्याचा लूक फारच लक्षवेधी आहे. एका नव्या आणि आव्हानात्मक भूमिकेतून अक्षय खन्ना प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झाला आहे.
View this post on Instagram
कधी रिलीज होणार?
मेकर्सकडून मिळालेल्या माहितीनुसार, ‘छावा’ हा सिनेमा येत्या 14 फेब्रुवारी 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात अभिनेता अक्षय खन्ना निगेटिव्ह भूमिकेत दिसणार आहे. तर अभिनेत्री रश्मिका मंदाना ही महाराणी येसूबाईंची भूमिका साकारणार आहे. अलीकडेच मेकर्सने शेअर केलेल्या पोस्टरमध्ये सुंदर स्मितहास्य देत, अतिशय हेवी ज्वेलरीसह कमालीच्या लूकमध्ये ती दिसून आली आहे. याशिवाय आणखी एका पोस्टरमध्ये मात्र ती थोडी गंभीर हावभाव देताना दिसत आहे.
छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत ‘हा’ अभिनेता
‘छावा’ सिनेमातून अभिनेता विक्की कौशल छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत झळकणार आहे. त्याच्याही भूमिकेचे पोस्टर समोर आले असून यामध्ये तो सिंहासनावर विराजमान झाल्याचे दिसत आहे. या सिनेमाबाबत आणि आपल्या भूमिकेबाबत विक्की फारच उत्साही आहे. मराठा साम्राज्याचा इतिहास आणि गौरव मोठ्या पडद्यावर आणण्यासाठी मेकर्स सज्ज आहेत आणि यांसह एक कमालीची स्टारकास्ट ऐतिहासिक भूमिकांमधून आपल्या भेटीस येत आहे.
आज 22 जानेवारी रोजी सोशल मीडियावर ट्रेलर रिलीज होणार आहे. मैडॉक फिल्म्स निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केले आहे. कलाकारांचे फर्स्ट लूक पाहून सिनेमा रिलीज आधीच प्रचंड चर्चेत आहे.
हेही पाहा –