घरमनोरंजनरणवीर नाही तर दीपिका करतेय 'या' अभिनेत्याला किस

रणवीर नाही तर दीपिका करतेय ‘या’ अभिनेत्याला किस

Subscribe

दररोज छपाक चित्रपटाचे व्हीडीओ, फोटो सध्या सोशलमिडीयावर दररोज मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतात. या व्हीडीओला, फोटोला मोठ्या प्रेक्षकांची पसंती कायमच मिळते. दीपिका या सिनेमात अ‍ॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या लक्ष्मी अग्रवालची भूमिका साकारत आहे. नुकताच छपाक मधला दीपिकाचा एक व्हीडीओ व्हायरल झाला आहे. काहींनी या व्हीडीओला लाईक केलय तर काहींनी नाकं मुरडली आहेत. हा व्हिडीओ  लिक झाल्यापासून फक्त दीपिकाचीच चर्चा सोशल मीडियावर रंगत आहे.

काय आहे व्हीडीओत

लिक झालेला व्हिडीओत दीपिका आणि चित्रपटाचा नायक विक्रांत गच्चीवर एकमेकांना किस करताना दिसत आहेत. दीपिकाचा पहिला व्हीडीओ व्हायरल झाला होता तेव्हा तीच्या लूकची मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली होती. सगळ्यांनी या लूक कौतूकही केलं होतं. मात्र दीपिकाच्या व्हायरल किसींग सीनमुळे सोशलमिडीयावर संमिश्र प्रतिक्रीया उमटल्या आहेत. या आधी चित्रपटातील आणखी एक व्हीडीओ व्हायरल झाला होता. त्यात दीपिका स्कूल युनीफॉर्ममध्ये दिसली होती.

 

View this post on Instagram

 

❤️

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

- Advertisement -

सध्या दिल्लीमध्ये या सिनेमाच्या काही भागाचे शूटिंग सुरू असून संपूर्ण टीमला भयंकर उकाड्याला समोरे जावे लागत आहे.त्याचबरोबर चित्रपटात दीपिकाच्या मेकअपवर विशेष मेहनत घेतलेली आहे. दीपिकाला या भूमिकेसाठी मेकअपला जवळपास तीन-चार तास लागतात. तर हा मेकअप काढण्यासाठी त्यापेक्षा देखील अधिक वेळ लागतो. छपाक’ सिनेमाचे दिग्दर्शन मेघना गुलजार करणार असून हा सिनेमा १० जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -