घरताज्या घडामोडीखुशखबर! 'छपाक' आणि 'तान्हाजी' पाहता येणार फ्रीमध्ये

खुशखबर! ‘छपाक’ आणि ‘तान्हाजी’ पाहता येणार फ्रीमध्ये

Subscribe

'छपाक' चित्रपटाला फ्लॉप करण्यासाठी भाजप नेत्यांकडून 'तान्हाजी' चित्रपटाची तिकिटं मोफत वाटली जात आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणने जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील आंदोलनाला भेट दिली होती. मात्र या भेटीनंतर दीपिकावर कौतुकाचा वर्षाव तर टीकेची झोड उठली आहे. तसंच भाजप नेते आणि समर्थकांनी देखील तिला ट्रोल करण्यास सुरू केलंं होत. या सर्व गोष्टींना दीपिकाला सामना करावा लागला. शुक्रवारी दीपिकाचा ‘छपाक’ तर अजय देवगणचा ‘तान्हाजी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यामुळे हे दोन्ही चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची स्पर्धा लागली आहे. परंतु दीपिकाने जेएनयू आंदोलनात सहभाग घेतल्यामुळे काही संघटनांकडून ‘छपाक’ला विरोध करण्यात येत आहे. तसंच ट्रोलर्सनी तिच्या या चित्रपटावर बहिष्कार घालण्याची देखील मोहीम राबवली आहे. तर दुसऱ्या बाजूला ‘तान्हाजी’ या चित्रपटाचं प्रमोशन केलं जात आहे.

सर्वसामान्यांना मोफत पाहण्याची संधी

दीपिकाचा ‘छपाक’ हा चित्रपट फ्लॉप करण्याच्या हेतूने मध्यप्रदेश मध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांकडून ‘तान्हाजी’ या चित्रपटाची तिकीटं मोफत वाटली आहेत. तर दुसऱ्या बाजूला युवक काँग्रेसकडून ‘छपाक’ या चित्रपटाची तिकिटं मोफत वाटली जातं आहे. याशिवाय उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी आपल्या कार्यकर्त्यांना ‘छपाक’ चित्रपट दाखवण्यासाठी संपूर्ण थेअटर बुक केलं आहे. त्यामुळे या राजकीय वादात सर्वसामान्यांना दोन्ही चित्रपट मोफत पाहण्यास संधी मिळतं आहे.

- Advertisement -

भाजपचे खासदार साक्षी महाराज यांनी दीपिकावर केली टीका

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण हिने नुकतीच जेएनयूमधील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला भेट दिली. त्यावर भाजपचे उन्नावचे खासदार साक्षी महाराज यांनी आयएएनएस ला दिलेल्या मुलाखतीत दीपिकावर टीका केली आहे. मुलाखती दरम्यान ते म्हणाले की, दीपिका पादुकोण ही तुकडे तुकडे गँगची सदस्य आहे. या सर्वांमागे काही परदेशी शक्तींचा देखील पाठींबा असल्याचे साक्षी महाराज यावेळी म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – मुंबईत पुन्हा सेक्स रॅकेट उघड, बॉलिवूडच्या दोन अभिनेत्रींना अटक


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -