घरताज्या घडामोडीबॉक्स ऑफिसवर 'तान्हाजी'चा धुमाकूळ

बॉक्स ऑफिसवर ‘तान्हाजी’चा धुमाकूळ

Subscribe

बॉक्स ऑफिसवर 'तान्हाजी' चित्रपट 'छपाक'वर भारी पडला आहे.

शुक्रवारी दीपिका पदुकोणचा ‘छपाक’ तर अजय देवगणचा ‘तान्हाजी – द अनसंग वॉरिअर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. हे दोन्ही चित्रपट प्रदर्शनापूर्वी वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. मात्र प्रदर्शित झाल्यानंतर दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतं आहे. परंतु बॉक्स ऑफिसवर ‘तान्हाजी’ चित्रपट ‘छपाक’वर भारी पडला आहे. बॉक्स ऑफिस इंडिया डॉट कॉमच्या रिपोर्टनुसार, अजयच्या ‘तान्हाजी – द अनसंग वॉरिअर’ चित्रपटाने पहिल्या दिवसापेक्षा दुसऱ्या दिवशी खूप कमाई केली आहे. बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी या चित्रपटाने १५.१० कोटींची कमाई केली होती तर दुसऱ्या दिवशी २० कोटींची कमाई केली आहे. दोन दिवसात तब्बल ३५ कोटींची कमाई या चित्रपटाने केली आहे.

- Advertisement -

तर ‘छपाक’ने बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवसाच्या तुलनेत दुसऱ्या दिवशी चांगली कमाई केली आहे. पहिल्या दिवशी दीपिकाच्या चित्रपटाने ४.७७ कोटींची कमाई केली होती. तर दुसऱ्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत ३०-४० टक्क्यांनी वाढ झाली. दुसऱ्या दिवशी ‘छपाक’ने ६ कोटींची कमाई केली. त्यानुसार दीपिका पदुकोणच्या ‘छपाक’ चित्रपटाने दोन दिवसात सुमारे ११ कोटींची कमाई केली आहे.

View this post on Instagram

#Chhapaak In cinemas now!?

A post shared by Malti (@deepikapadukone) on

- Advertisement -

ओम राऊत दिग्दर्शित ‘तान्हाजी’ या चित्रपटात अजय देवगण, काजोल, सैफ अली खान, पंकज त्रिपाठी आणि शरद केळकर प्रमुख भूमिकेत आहेत. तर मेघना गुलझार दिग्दर्शित ‘छपाक’ या चित्रपटात दीपिका पदुकोण आणि विक्रांत मेसी प्रमुख भूमिकेत आहेत.


हेही वाचा – फरहान-शिबानी लवकरच विवाहबंधनात अडकणार?


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -