घरमनोरंजन'छपाक': कंगणाच्या बहिणीवरही झाला होता अॅसिड हल्ला

‘छपाक’: कंगणाच्या बहिणीवरही झाला होता अॅसिड हल्ला

Subscribe

अभिनेत्री दिपीका पादुकोणचा आगामी 'छपाक' चित्रपटाचा पहिला लुक प्रदर्शना नंतर चांगलाच गाजत आहे.

अॅसिड हल्ल्यांवर भाष्य करणाऱ्या आगामी ‘छपका’ या चित्रपटाच्या शुटींगमध्ये सध्या अभिनेत्री दिपिका पादुकोन व्यस्त आहे. २०२० मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार असून या चित्रपटातील दिपिकाचा पहिला लुक प्रदर्शित करण्यात आला आहे. सध्या दिपिकाच्या चित्रपटातील या लुकची सोशल मिडियावर चांगलीच चर्चा होत आहे. मेघना गुलजार या चित्रपटाचे दिग्दर्शन करत असून अॅसिड हल्ल्याला बळी पडलेल्या लक्ष्मी अगरवालची भूमिका दिपिका साकारणार आहे. चित्रपटातील दिपिकाचा लुक बघून अभिनेत्री कंगणा रानौतची बहिण रंगोल चंडेलने दिपिकाच्या लुकवर ट्विट करत मी देखील अॅसिड हल्ल्याची पिडित असल्याचे म्हटले आहे. दरम्यन, दिपिकाचे या भूमिकेसाठी तिने कौतुक देखील केले आहे.

२३ व्या वर्षी अॅसिड हल्ला

रंगोल वर वयाच्या अवघ्या तेवीसाव्या वर्षी अॅसीड हल्ला झाला होता. एका मुलाखती दरम्यान, तीने आपल्यावर झालेल्या अॅसिड हल्ल्या विषयी सांगितले. त्या काळात आपल्याला खुप मोठा मानसिक तणाव सहन करावा लागला होता. माझ्या सारख्या अॅसिड हल्ला झालेल्या अनेक तरुणींना कोणतीही चुक नसताना देखील निष्कारण यातना सहन कराव्या लागतात. एक प्रकारची शिक्षाच भोगावी लागत असल्याचे तिने या मुलाखतीत म्हटले होते. माझ्यावर एकतर्फी प्रेमातून एका तरुणाने अॅसिड हल्ला केला होता. या हल्ल्यात माझा डोळा ९० टक्के निकामी झाला होता. हल्लयानंतर मी स्वतला तीन महिने आरश्या पासून दुर ठेवले होते. या अॅसिड हल्ल्यानंतर माझ्या अन्ननलिका आणि श्वसन नलिकेत अडथळे निर्माण झाले होते. अॅसिड हल्यात जळालेल्या माझ्या चेहऱ्यावर ५७ वेळा सर्जरी करण्यात आली असल्याचे तिने सांगितले.

- Advertisement -

ट्विटर प्रतिक्रिया

‘राझी’, ‘तलवार’ यांसारखे वेगळ्या विषयाचे चित्रपट देणाऱ्या भावना गुलजार छपाक चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. १० जानेवारी २०२० ला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातील दिपिकाचा पहिला लुक पाहून कंगणा राणौतची बहिण रांगोल पटेल भाउक झाली आहे. यामुळे आपल्यावर झालेल्या अॅसिड हल्ल्याच्या वाईट आठवणी ताज्या झाल्या असून छपाकसाठी तिने कंगणा आणि दिग्दर्शक भावना गुलजार यांचे कौतुक केले आहे. तसेच आपण देखील अॅसिड हल्ला पिडित असून या चित्रपटाच्या प्रसिद्धीस उभे राहायला आवडेल. जगात कितिही अन्याय किंवा भेदभाव होऊ दे, आपण एखाद्या गोष्टीचा द्वेष करत असलो तर आपण देखील तसेच कृत्य करता कामा नये. अशी प्रतिक्रिया तिने ट्विटर वरुन दिली आहे. छपाक चित्रपटात दिपिका अॅसिड हल्ला पिडित लक्ष्मी अगरवालची भूमिका साकारत असून ती स्वत: या चित्रपटाची निर्माती आहे.

- Advertisement -

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -