Thursday, March 27, 2025
27 C
Mumbai
HomeमनोरंजनChhaya Kadam : PIFF मध्ये छाया कदम यांचा मानाच्या पुरस्काराने सन्मान

Chhaya Kadam : PIFF मध्ये छाया कदम यांचा मानाच्या पुरस्काराने सन्मान

Subscribe

गतवर्षीपासून ज्यांनी लागोपाठ पुरस्कार सोहळ्यात मानाचे पुरस्कार मिळवले अशा अष्टपैलू अभिनेत्री छाया कदम यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. माहितीनुसार, छाया कदम यांनी ‘स्नो फ्लॉवर’साठी एक मानाचा पुरस्कार पटकावला आहे. पुणे इंटरॅशनल फिल्म फेस्टीवल अर्थात PIFF मध्ये ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री’ श्रेणीचा अत्यंत मानाचा पुरस्कार अभिनेत्री छाया कदम यांना मिळालाय. (chhaya kadam awarded in piff for snow flower)

 

View this post on Instagram

 

A post shared by Chhaya Kadam (@chhaya.kadam.75)

काही दिवसांपासून सुरू असलेल्या पुणे इंटरॅशनल फिल्म फेस्टीवलमध्ये वैविध्यपूर्ण चित्रपटाचं स्क्रिनिंग, कलाकार दिग्दर्शक यांच्या चर्चा होताना सगळ्यांनी पाहिल्या आणि आज पुणे इंटरॅशनल फिल्म फेस्टीवल मध्ये हा खास पुरस्कार सोहळा संपन्न झाला. छाया कदम यांना स्नो फ्लॉवर साठी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा खास पुरस्कार प्राप्त झाला आहे. छाया कदम यांच्या पुरस्कारांचा हा सिलसिला असाच सुरू असून येणाऱ्या काळात त्या अनेक प्रोजेक्ट्स चा महत्त्वपूर्ण भाग असणार असल्याचं कळतंय. कमालीच्या दमदार भूमिका छाया कदम यांनी आजवर साकारल्या आहेत या कामाची पोचपावती म्हणून हा अजून एक महत्त्वपूर्ण पुरस्कार त्यांनी पटकावला आहे.

‘स्नो फ्लॉवर’चे कथानक

‘स्नो फ्लॉवर’ हा मराठी भाषेतील एक चित्रपट आहे. जो दोन देशांतील एक हृदयस्पर्शी कथा दर्शवतो. चित्रपटाचे कथानक रशिया आणि कोकण या दोन वेगवेगळ्या संस्कृतींना एकत्र जोडणारे आहे. बर्फाळ सायबेरिया आणि हिरवळीचे कोकण अशा विरोधाभासी पार्श्वभूमीवर आधारलेला हा चित्रपट अत्यंत लक्षवेधी आहे. भारतात राहणाऱ्या आजी आणि रशियामध्ये राहणाऱ्या तिच्या नातवामधील ‘अंतर’ दर्शवितो. या चित्रपटातील पात्रांचा भावनिक गोंधळ आपल्याला विचारात पाडतो.

हेही पहा –

Sun Marathi Serials : सन मराठीवर साजरा होणार व्हॅलेंटाईन वीक, मालिकांमध्ये बहरणार प्रेम